
यरुशलम : इस्त्राइलमध्ये गुरुवारी हादरवून सोडणारी घटना घडली आहे. येथील एका महामार्गावर एका वाहनाने १३ पादचाऱ्यांना चिरडले आहे. यामध्ये १० जण गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये दोघांची एकाची प्रकृती गंभीर आहे. सहा जणांना उपचारासाठी हदेरा यथली हिलेल याफे मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लगेचच हल्लेखोराला जागीच ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला हल्लेखोर हा २४ वर्षीय अरब इस्रायली असल्याचे सांगितले. पण इस्रायली सुरक्षा संस्थेने पोलिसांचा हा दावा खोडून काढत हल्लेखोर पॅलेस्टिनी सांगितले. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. इस्त्राइलच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ०४:१८ मिनिटांनी ही घटना घडली आहे. ज्यामध्ये २० ते ७० वयोगटातील आठ जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे. इस्त्राइली माध्यमांच्या वृत्तानुसार, हायवे क्रमांक ६५ वरील कारकुर चौकाजवळ दोन पोलीस अधिकाऱ्यांवर चाकूने वार करण्यात आले. सुरुवातीला पळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित हल्लेखोऱाला पुढे गण शमुएलजवळ अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी सांगितले की, माले आयर्न येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षीय अरब इस्त्राईली तरुणाला सुरक्षा जवानांनी ठार केले आहे. घटनेबद्दल एका इस्त्राइली प्रवक्त्याने सांगितले की, 'कारकुर जंक्शनवर गाडी वेगाने गेली आणि लोकांच्या एका जमावाला धडकली. नंतर गाडी एका बस स्टॉपवर आदळले. तिथून त्याने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो जवळच्या पोलिसांच्या गाडीच्या दिशेने वेगाने गेला आणि त्याला धडकला. अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्याला पकडण्यात आले आणि ठार करण्यात आले.तरुणाने हा हल्ला एकट्याने केला की त्याच्यासोबत आणखी कोणी होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. एमडीएचे महासंचालक अली बिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सुरक्षा दलांसह घटनास्थळी आहोत आणि परिसराची चौकशी करत आहोत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bdtyoD7
No comments:
Post a Comment