Breaking

Friday, February 28, 2025

रशिद खान ठरला अफगाणिस्तानसाठी व्हिलन, कोणती चूक सर्वात महागात पडली जाणून घ्या.. https://ift.tt/TxVSmaD

लाहोर : अफगाणिस्तान आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर पडल्याचे समोर आले आहे. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. पण यावेळी रशिद खान हा अफगाणिस्तानसाठी व्हिलन ठरल्याचे म्हटले जात आहे. कारण रशिद खानकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा फटका अफगाणिस्तानच्या संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट नेमकी घडली तरी कधी...

ही गोष्ट घडली ती सामन्याच्या चौथ्याच षटकात. त्यावेळी अफगाणिस्तानचा फझल फारुखी हा गोलंदाजी करत होता, तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड हा फलंदाजी करत होता. या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेड हा मोठा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला. पण यावेळी फटका खेळताना हेडकडून एक मोठी चूक झाली आणि त्याचे टायमिंग चुकले. त्यावेळी हेडला हा फटका जोरात मारता आला नाही.हा फटका सीमारेषेजवळ जाणार नाही हे निश्चित होते. जिथे हा चेंडू जात होता तिथे रशिद खान असल्याचे दिसत होते. त्यामुळे आता रशिद खान हा झेल पकडणार, असे दिसत होते. रशिद खान आपल्या डावीकडे झेपावला आणि हा चेंडू रशिद खानच्या हातात आला होता. पण रशिक खानला हा चेंडू आपल्या हातात धरता आला नाही. हा चेंडू रशिद खानच्या हातून निसटला आणि हेडला यावेळी जीवदान मिळाले. त्यावेळी फक्त सहा धावांवर खेळत होता. त्यानंतर हेडने या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला आणि त्यानंतर हेडने नाबाद ५९ धावांची खेळी महत्वाची ठरली. त्यामुळे हे जीवदान अफगाणिस्तानला चांगलेच महाग पडल्याचे पाहायला मिळाले. रशिदने जर ही कॅच पकडली असती तर त्यांना ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवता आला असता आणि कदाचित सामन्याचा नूर बदलू शकला असता. पण रशिद खानने हा झेल सोडला आणि त्यामुळे तो अफगाणिस्तानसाठी व्हिलन ठरल्याचे म्हटले जात आहे. रशिद खान हा अफगाणिस्तानसाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. पण या सामन्यात मात्र त्याच्याकडून मोठी चूक घडली आणि त्यामुळेच चाहते त्याच्यावर टीका करत असल्याचे आता समोर येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rHWXCux

No comments:

Post a Comment