
मुंबई: 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असणारी कोकणातील इन्फ्लूएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. 'बिग बॉस मराठी ५' फेम कोकण हार्टेड गर्लने संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न केले. तिने खास पोस्ट शेअर करत या सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. काहीच तासापूर्वी त्यांच्या हळद समारंभाचे फोटो समोर आले होते आणि आता लगेचच लग्नाचेही फोटो त्यांनी शेअर केलेत. अंकिताने खास कॅप्शनसह तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केलेत. 'वालावलकरांचो थोरलो जावई' असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. अंकिता त्यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी असून तिला दोन धाकट्या बहिणी आहेत. त्यामुळे या 'थोरल्या जावया'ची ओळख करुन देणारी ही खास पोस्ट अंकिताने शेअर केली. तिने पुढे लिहिले की, 'मी त्याची पत्नी झाली आहे, याकरता माझा नवरा कुणाल भगतचे खूप अभिनंदन. तो धन्य झाला आहे.'
कोकणातील खास मंदिरात बांधली लग्नगाठ
अंकिताच्या लग्नाची तारीख किंवा हा सोहळा कुठे होणार आहे, याबाबतचा तपशील आतापर्यंत समोर आला नव्हता. अंकिताने लग्न लागल्यानंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लग्नाचे ठिकाण नेमके कुठे होते ते सांगितले. अंकिता-कुणाल यांच्या आयुष्यातील खास दिवस कोकणातील एका मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या 'लक्ष्मीनारायण मंदिरा'त लग्नगाठ बांधली. या मंदिरात सुंदर मंडप सजवण्यात आला होता, फुलांची सजावट करण्यात आलेली. अंकिताने अगदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात एन्ट्री केली. यावेळी तिने पिवळी-गुलाबी रंगाची दाक्षिणात्य स्टाइलची साडी परिधान केली होती. तर कुणालने सफेद कुर्ता, पिवळ्या रंगाची धोती आणि गुलाबी शेला असा लूक केला आहे. अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या लग्नसोहळ्यातील एक व्हिडिओही अंकिताने शेअर केला, यावेळी नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद अक्षरश: ओसंडून वाहतोय. लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे लग्नातील 'कानपिळी' या विधीचा मान अंकिताच्या बहिणींना देण्यात आला होता.from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MOzvlrd
No comments:
Post a Comment