मुंबई- मराठमोळा अभिनेता सध्या आघाडीच्या स्थानावर आहे. रियालिटी शो , मालिका आणि चित्रपट यांसारख्या बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सध्या तो गाजतोय. प्रसादने केवळ अभिनय क्षेत्रात मर्यादित न ठेवता आता दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात सुद्धा हात घातलेला पाहायला मिळतोय. अभिनयाप्रमाणेच त्याला या क्षेत्रात सुद्धा भरभरून यश मिळाले आहे. आज १७ फेब्रुवारी रोजी प्रसाद ओक त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करतोय. प्रसाद सर्वात शेवटी धर्मवीर २ या सिनेमात दिसलेला. आता जरी तो मोठ्या घरात राहत असला तरीही एक काळ असा होता की त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हते. दादरच्या टॉकीज समोर तो रात्रभर झोपायचा. बऱ्याच मुलाखतींमध्ये त्याने त्याचा संघर्षाचा काळ शेअर केला आहे.प्रसाद ओक याच्या या संघर्षामध्ये त्याची पत्नी ही खंबीरपणे उभी होती. दोघांनीही लव मॅरेज केले आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक याने एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला, लग्नाच्या आदल्या दिवशी प्रयोग संपवून लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो. तेव्हा मंजिरीची आई माझी वाट बघत होती. मी गेलो तेव्हा सासूबाई म्हणाल्या- तुम्ही आलात का? तर आता तयार व्हा. मुळात माझी खेचायची सवय आहे. त्यांना तेव्हा उत्तर देत मी म्हणालो की तयार काय व्हायचं? मी असाच लग्नाला उभा राहणार. त्यानंतर सासूबाई आत मध्ये जाऊन रडायला लागल्या. तेव्हा त्यांनी मंजुला सांगितलं. अगं! ते लग्नाला अर्ध्या पॅन्ट मध्ये उभे राहणार आहेत." प्रसाद ओक याच्या सासुबाई मंजिरीला म्हणाल्या की, अगं, तेवढे कपडे घेतलेत आता त्यांचं काय करायचं? आपल्याकडे गावचे लोक आहेत ते काय म्हणतील ? अगं, ते लग्नात अर्ध्या पॅन्ट मध्येच उभे राहणार असं म्हणत आहे. तेव्हा मंजिरीने आईला म्हटलं आई अगं मुळात ती थ्री फोर आहे. आणि दुसरं म्हणजे तो लग्नात असा उभा राहणार नाही. प्रसाद ओक सोबत आता त्याची पत्नी म्हणजे मंजिरी ओक ती सुद्धा निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. हिरकणी, चंद्रमुखी सारख्या सिनेमात तिने निर्मिती म्हणून प्रसादला मदत केली होती. सध्या प्रसाद बुक महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5LSyh7Z
No comments:
Post a Comment