मुंबई- अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पिंक' चित्रपटातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीने सर्वांचे मन जिंकले. शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. हा चित्रपट अंगदच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरलाच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे दिवंगत वडील आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंह बेदी यांच्याशी त्याचे ताणलेले नातेही सुधारण्यास मदत झाली. अंगदने खुलासा केला की त्याने किशोरावस्थेत त्याचे केस कापले होते, ज्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर २० वर्ष रागावले होते. मात्र 'पिंक' सिनेमाने या बाप लेकाच्या ताणलेले नात्याला सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.आज अभिनेता त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. एका पॉडकास्टवर झालेल्या संभाषणादरम्यान, अंगद बेदीने त्याचे वडील कामासाठी केस कापल्यानंतर कसे दुखावले गेले होते आणि अस्वस्थ झाले होते याबद्दलचा किस्सा शेअर केला. जेव्हा या अंगदने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याला सांगण्यात आलेले की त्याचे लांब केस इंडस्ट्रीत चालणार नाहीत. अंगद म्हणाला की लांब केस कापण्याचा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक होता आणि 'पिंक' चित्रपटाच्या रिलीजनंतर त्याचा त्याचा फायदा झाला. अंगद म्हणाला की, 'मी काय करणार होतो?' मला वाटलं जर मला पूर्ण ताकदीने काम करायचे असेल तर मी तेच करीन जे गरडेचे आहे. माझे वडील २० वर्ष या गोष्टीमुळे त्रस्त होते. पण, पिंकच्या रिलीजनंतर त्यांचा राग संपला. अभिनेता म्हणाला की त्याने वयाच्या १९ व्या वर्षी केस कापले होते आणि 'पिंक' हा चित्रपट तो ३३ वर्षांचा झाल्यावर रिलीज झाला होता. या इतक्या वर्षात त्याचे वडील त्याच्याशी अजिबात बोलले नाहीत असा दावा अंगदने केला. पण, 'पिंक' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अंगदच्या वडिलांनी त्याला मिठी मारली आणि त्याचे चित्रपट काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला दिला. स्वतःसाठी योग्य मार्ग निवडल्याबद्दल त्याला त्याच्या वडिलांकडून आशीर्वादही मिळाला. अंगद पुढे म्हणाला की, अनेक लोकांनी त्याला पुन्हा केस वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले. अंगद बेदी 'टायगर जिंदा है', 'डियर जिंदगी' आणि 'गुंजन सक्सेना' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. कामाच्या बाबतीत, या अभिनेत्याचे याशिवाय गेल्या वर्षात त्याचे 'हाय पप्पा', 'घूमर' आणि 'लस्ट स्टोरीज २' सारख्या सिनेमे रिलीज झाल्या ज्यासाठी त्याचे कौतुकही खूप झाले होते. अंगद बेदीने अभिनेत्री नेहा धुपियाशी लग्न केले. त्यांना आता दोन मुलं आहे. अंगद नेहा आणि त्यांची दोन मुलं बरेचदा फॅमिली टाइम घालवताना दिसतात पण त्यांनी अद्याप मुलांचे चेहरे दाखवलेले नाहीत.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2miEoWj
No comments:
Post a Comment