मुंबई : अमाप संपत्तीचे वारसदार आणि एका बड्या उद्योगपतीच्या मुलांनी गुरुवारी ऐशोआरामाचं जीवन नाकारून अध्यात्माचा मार्ग निवडला. या चार तरुण - तरुणी दीक्षा घेऊन जैन साधू आणि साध्वी बनले. यांच्या दीक्षा समारंभासाठी घाटकोपरमध्ये उदयपूर १.२५ लाख चौरस फूट परिसरात एक महाल बांधण्यात आला होता. तिथे गुरुवारी चार तरुणांनी जाहीरपणे संसाराचा त्याग केला. ७ फेब्रुवारी रोजी ते साधूचा वेश धारण करतील. मुंबईती चार तरुण आणि तरुणी यांनी सर्व संपत्तीचा त्याग केला. आर्यन जवेरी, वृष्टि बाउवा, ध्रुति नागदा आणि युति शाह या चौघांनी सांसारिक सुखांचा त्याग करून भिक्षू आणि नन बनण्याचा निर्णय घेतला आहे. हे चार तरुण पूर्वी मजेशीर, ऐश्वर्यात जगत होते. आता मात्र ते आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावर चालणार आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व तरुण, तरुणी बड्या व्यापारी घराण्यातील आहेत. आर्यन जवेरी या तरुणाला नवनवीन ठिकाणी फिरण्याची आणि खाण्याची आवड होती. वृष्टीला बाईकवरून प्रवास करायला आवडायचा. ध्रुतिला गाणी ऐकायला आवडायची. तर युतिला चित्रपट पाहण्यात मजा यायची, पण आता या चौघांनीही ही संपूर्ण आवड, मजा त्यागली असून ही आवड त्यांच्यासाठी आयुष्यातील भूतकाळ ठरला आहे.
आर्यन जवेरी कोट्यवधींच्या संपत्तीचा वारस
आर्यनला लहानपणापासूनच दीक्षा घेऊन साधू बनायचं होतं. २४ वर्षीय आर्यन शेकडो कोटींच्या संपत्तीचा वारस आहे. त्याचे वडील जुबिन जवेरी हे एका औषध कंपनीचे मालक आहेत. जुबिन जवेरी यांनी सांगितलं, की ज्यावेळी आर्यन इयत्ता सातवीत होता, त्यावेळी त्याने पहिल्यांदा दीक्षा घेण्याचं सांगितलं होतं. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्याने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पुढे डिग्री घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. आर्यनचं मन संन्यासाकडे जाऊ नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला २ कोटी रुपयांची कार आणि सर्व सुखसोयी, ऐश्वर्य देण्याचा प्रयत्न केला. पण आर्यनचं मन ते बदलू शकले नाहीत. आता जुबिन जवेरी यांचा असा विश्वास आहे की जगातील कोणतीही संपत्ती आपल्या मुलाच्या आकांक्षेपेक्षा मोठी असू शकत नाही. तसंच कोणीही त्याचं मन बदलू शकत नाही. ज्यांना आध्यात्मिक प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी हा मार्ग असल्याचं आर्यनचं म्हणणं आहे. ऐश्वर्य सोडून संन्यासाच्या मार्गावर चालणारा आर्यन एकटा नसून वृष्टि, ध्रुति आणि युति या तिघांनीही लग्झरी आयुष्याचा त्याग केला.पैसै, दागिने आणि संसारिक वस्तू वाटून टाकल्या
या तरुणांनी गुरुवारी सकाळी ५ तासांच्या मिरवणुकीनंतर जाहीरपणे सर्व काही त्यागण्याची घोषणा केली. एकेकाळी धनाढ्य संपत्ती असलेल्या या मुलांनी पैसे, दागिने आणि सर्व ऐहिक वस्तू वाटल्या. या कार्यक्रमाचं संयोजक केतन मेहता यांनी सांगितलं, की या तरुणांनी काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी भौतिक सुखसोयींचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी भौतिक गोष्टींचा त्याग हा त्याग नसून नवीन आयुष्याची प्राप्ती आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/s3n7Kev
No comments:
Post a Comment