
रावळपिंडी : पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. कारण पाकिस्तान यजमान असूनही आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर गेली आहे. पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यात आता भारताचे खास कनेक्शन असल्याचे आता समोर आले आहे.
सामना न खेळताही पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर...
पाकिस्तानच्या संघावर सामना न खेळताच चॅम्पियन्स ट्रॉफीबाहेर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. कारण यापूर्वी पाकिस्तान दोन्ही सामन्यांत पराभूत झाला होता. भारताविरुद्ध जेव्हा पाकिस्तान पराभूत झाला तेव्हा त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. पण पाकिस्तानची आशा यावेळी बांगलादेशच्या संघावर होती. न्यूझीलंडवर बांगलादेशने विजय साकारला असता तर पाकिस्तानचे आव्हान कायम राहीले असते. पण बांगलादेशचा पराभव झाला आणि पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला.पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यात कोणतं भारताचं कनेक्शन...
पाकिस्तानचा एक तर सामनाच नव्हता. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. पण यामध्ये आता भारताचं कनेक्शन समोर आलं आहे. कारण बांगलादेशला पराभूत करुन पाकिस्तानलाही स्पर्धेबाहेर करण्यात सर्वात मोठा वाटा उचलला होता तो भारताच्या वंशाच्या राचिन रवींद्रचा. कारण रचिन रवींद्रने शतक झळकावत एकाकी किल्ला लढवला आणि बांगलादेशसाठी तो कर्दनकाळ ठरला. राचिनचे नावही भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंवरुन ठेवण्यात आले आहे. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा सुंदर मिलाप करत राचिनचे नाव ठेवण्यात आले आहे. राचिनला चॅम्पियन्स ट्रॉफीत मोठी दुखापतही झाली होती. मैदानात तो रक्तबंबाळ झाला होता. पण त्याने हार मानली नाही. बांगलादेशच्या सामन्यात जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तो मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश यांना स्पर्धेबाहेर करण्यात भारताचे कनेक्शन कसे आहे, हे आता समोर आले आहे.पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांना एकाचवेळी न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर काढले आहे. त्यामध्ये राचिन रवींद्रच्या शतकाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात राचिन भारताविरुद्ध कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली असणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GN8IuUX
No comments:
Post a Comment