
दुबई : भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानवर विजय साकारला होता. पण सोमवारी त्यांचा कोणताही सामना नव्हता. पण सामना नसतानाही भारतीय संघाला आता सर्वात मोठी गुड न्यूज मिळाली आहे.भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. कारण भारताचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय होता. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते. त्यानंतर रविवारी दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला धुळ चारली. पण त्यानंतर आता भारताच्या संघाला तिसऱ्या सामन्यापूर्वी गुड न्यूज मिळाली आहे.सोमवारी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव केला. यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर गेले आहेत. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर गेल्यामुळे भारताचे चाहते आनंदी झाले असतीलच, पण त्यानंतरही भारताच्या चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आता समोर आली आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 'अ' गटात भारत आणि पाकिस्तानसह अजून दोन देश होते आणि ते म्हणजे न्यूझीलंड आणि बांगलादेश. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता दोन संघ राहीले आहेत, जे आहेत भारत आणि न्यझीलंड हे दोन्ही देश आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्याचे समोर आले आहे. कारण प्रत्येक गटातील दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहेत. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश आता सेमी फायनलमध्ये दाखल झाले आहेत.भारत आणि न्यूझीलंड हे सेमी फायनलमध्ये दाखल झाले कारण, हे दोन्ही देश दोन सामने खेळले. या दोन्ही साामन्यांत त्यांनी विजय साकारला. दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेश यांना दोन सामन्यांत एकही विजय साकारता आला नाही. त्यामुळे भारताच्या गटातून दोन संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाले आहेत.पाकिस्तानने यापूर्वी १९९६ साली आयसीसीचा वर्ल्ड कप आयोजित केला होता. हे यावेळी सह यजमान होते. पण त्यानंतर आता थेट २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये आयसीसीची स्पर्धा रंगत होती आणि त्यामध्ये त्यांना आता बाहेर पडावे लागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VyhHN0C
No comments:
Post a Comment