नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने २०२३ मध्ये संसदेत मंजूर केलेल्या नव्या कायद्यानुसार देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या बैठकीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. या कायद्यालाच काँग्रेसने आव्हान दिले आहे. यावरील सुनावणी उद्या, बुधवारी अपेक्षित असताना आयुक्तांच्या निवडीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक पार पडली. त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवल्यावरही सोमवारी रात्री उशिरा मुख्य निवडणूक आयुक्तपदी यांची निवड करण्यात आली. राजीव कुमार आज, मंगळवारी सेवानिवृत्त निवृत्त होणार आहेत. ज्ञानेश कुमार हे सर्वांत वरिष्ठ निवडणूक आयुक्त असल्याने त्यांचीच या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील. मात्र या नव्या नियुक्तीच्या दरम्यान काही घडले, तर ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहील, असे राहील, असे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीत स्पष्ट केले आहे.मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेल्या निवड समितीच्या शिफारशींनुसार ही नियुक्ती केली जाते. होण्यापूर्वी नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी निवड समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. त्यात राहुल यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीनंतरच काँग्रेसने ही बैठक घाईघाईत बोलावल्याचा आरोप करताना न्यायालयीन सुनावणीनंतरच ती घ्यायला हवी होती, असा आग्रह काँग्रेसने धरला.सन २०२३ च्या नव्या कायद्यानुसार या निवड समितीतील पदाधिकाऱ्यांमध्ये पंतप्रधान, एक केंद्रीय मंत्री व विरोधी पक्षनेते असतात. याला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यानंतर ‘कायदे करणे हा संसदेचा सर्वाधिकार आहे. या समितीची स्वतंत्रता व निष्पक्षता कायम राखण्यासाठी यात फक्त कार्यपाालिकेचे वर्चस्व न राखता घटनात्मक पदावर असलेल्या सरन्यायाधीशांना समाविष्ट केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते,’ असे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jwLQvRu
No comments:
Post a Comment