वडोदरा : आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर च्या दुसऱ्या सामन्यात दमदार विजय साकारला. या विजयानंतर आरसीबीच्या संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. आरसीबीने दिल्लीचा डाव यावेळी १४१ धावांत गुंडळाला. १४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीचा संघ दाखल झाला आणि कर्णधार स्मृती मानधनाने तुफानी खेळी साकारत संघच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आरसीबीने दिल्लीवर यावेळी आठ विकेट्स राखून विजय साकरला. या विजयानंतर आरसीबीला एक मोठी गुड न्यूज मिळाली आहे.
स्मृती मानधनाची धडाकेबाज फटकेबाजी...
स्मृती मानधनाने संघाला तुफानी सुरुवात करून देताना विजय निश्चित केला होता. स्मृतीने सुरुवातीपासून धमाकेदार फटकेबाजी केली. स्मृतीला यावेळी डॅनी हॉजने सुयोग्य साथ दिली. त्यामुळेच स्मृती आणि डॅनी यांनी आरसीबीच्या संघाला १०७ धावांची सलामी दिली. डॅनी यावेळी ४१ धावांवर बाद झाली असली तरी स्मृतीने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. स्मृतीने आपले अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर ती थांबली नाही. स्मृती आक्रमक फलंदाजी करत होती, त्यामुळे स्मृती किती धावा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण स्मृतीला नाबाद राहत संघाला विजय मिळवून देता आला असता. पण स्मृतीला ते जमले नाही. स्मृतीने यावेळी फक्त ४७ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ८१ धावांची दमदार खेळी साकारली.आरसीबीला कोणती मिळाली गुड न्यूज...
आरसीबी आणि दिल्ली यांनी या सामन्यापूर्वी प्रत्येकी एक लढत खेळली होती. दोन्ही संघांनी या पहिल्या लढतीत विजय मिळवले होते. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात दोन गुणांची कमाई करता आली होती. त्यामुळे दुसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. कारण जो संघ हा सामना जिंकणार होता, त्याला अव्वल स्थान मिळवता येणार होते. आरसीबीने हा सामना जिंकला आणि त्यांनी आपले अव्वल स्थान कायम राखत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात रेणुका सिंग आणि जॉर्जिया यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले होते, त्यामुळेच आरसीबीला दिल्लीला १४१ धावांत रोखता आले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Wbpr3ta
No comments:
Post a Comment