
मुंबई- बॉलिवूडमध्ये यांना एक उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ओळखतात, परंतु फारच कमी लोकांना ठाऊक असेल की ते उत्तम सिंगल फादरसुद्धा आहेत. प्रकाश झा यांचे लग्न खूप उशिरा झाले, पण त्याआधीच त्यांनी ठरवले होते की काहीही झाल तरी मुलगी दत्तक घ्यायची. आज प्रकाश झा यांच्या वाढदिवसानिमित्त खास गोष्ट जाणून घेऊ. प्रकाश यांनी स्वत:ला दिलेले वचन पाळले अन् एक बाप आपल्या मुलांसाठी जे जे करतो ते सर्व काही त्या मुलीसाठी केले.असे अनेक पालक आहेत जे मुलीच्या जन्मानंतर तिला फेकून देतात किंवा गर्भाशयातच मारून टाकतात. पण प्रकाश झा यांनी त्या मुलीला दत्तक घेऊन तिला वडिलांचे प्रेम दिले, ज्या मुलीला तिच्या खऱ्या पालकांनी सिनेमागृहातील सीटखाली अतिशय वाईट अवस्थेत टाकले होते. प्रकाश झा यांनी त्या मुलीला वाढवले आणि तिला इतके सक्षम बनवले की आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे व आपल्या वडिलांचे नाव उज्ज्वल करत आहे. प्रकाश झा यांनी जे केले ते लाखो लोकांसाठी एक प्रेरणादायी आणि अतुलनीय आहे. प्रकाश झा यांचा मुलगी दत्तक घेण्याचा निर्णयप्रकाश झा यांची दत्तक मुलगी काय करत आहे आणि ती आता कुठे आहे हे सांगण्यापूर्वी, प्रथम त्या क्षणाबद्दल जाणून घ्या जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाला वाटले की आपण मुलगी दत्तक घेतली पाहिजे. तेव्हा प्रकाश झा सुमारे २० वर्षांचे होते. ते पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होते. त्याच काळात, प्रकाश झा यांनी 'श्री वत्स' नावाचा एक चित्रपट बनवला, ज्याचे शूटिंग त्यांनी एका अनाथाश्रमातील मुलांसोबत केले. त्या मुलांसोबत वेळ घालवताना, प्रकाश झा यांना जाणवले की ती मुलं प्रेमासाठी किती भुकेली आहेत. मग प्रकाश झा यांनी मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.पत्नी दीप्ती नवलचा गर्भपात अन्...प्रकाश झा यांची मुलगी दत्तक घेण्याची इच्छा लग्नानंतरही कायम होती. अभिनेत्री दीप्ती नवलशी लग्न केल्यानंतर प्रकाश झा यांनी बाळाची प्लॅनिंग करायला सुरुवात केली. पण मुलगी दत्तक घेण्याची इच्छा कायम होती. त्यांनी दीप्ती नवललाही याबद्दल सांगितले होते. दीप्ती नवल देखील यासाठी तयार होती. पण प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांच्या वैवाहिक जीवनात उलथापालथ झाली जेव्हा दीप्तीचा आठवा महिना पूर्ण झाल्यानंतर गर्भपात झाला. ती जखम इतकी खोल होती की प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांचा घटस्फोट झाला. तेव्हाच त्यांनी मनात पक्क केलं आता काही झालं तरी मुलगी दत्तक घ्यायचीचच... सिनेमा हॉलच्या सीटखाली एक मुलगी आढळली, पण या मुलीची अवस्था अशी होती की तिला पाहून कोणाचाही थरकाप उडेल. याबद्दल २०१५ मध्ये 'पॅरेंट सर्कल' मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये प्रकाश झा यांनी संपूर्ण कहाणी सांगितली होती. प्रकाश झा यांनी सांगितले होते की, १९८८ मध्ये त्यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून फोन आला जिथे ते स्वयंसेवा करत असत. त्यांना माहिती मिळाली की एका सिनेमा हॉलमध्ये एका सीटखाली १० दिवसांची मुलगी सापडली आहे, तिला कोणीतरी सोडून दिले आहे. त्या मुलीला संसर्ग झाला होता. संपूर्ण शरीर उंदीर आणि कीटकांनी कुरतडले होते. प्रकाश झा यांनी लगेच मुलीला घरी आणले आणि तिची पूर्ण काळजी घेतली. काही दिवसांतच ती मुलगी बरी झाली आणि प्रकाश झा यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला दत्तक घेतले. बाळाला खायला घालणे, आंघोळ घालणे सर्व काही केलेएकीकडे प्रकाश झा यांचे आयुष्य आनंदाने भरलेले होते, तर दुसरीकडे त्यांचा पत्नी दीप्ती नवलशी घटस्फोट होत होता. पण दीप्ती नवल मुलीला दत्तक घेतल्याने आनंदी होती. त्यांनी मुलीचे नाव दिशा ठेवले. प्रकाश झा त्यांच्या शूटिंगसाठी दिल्लीत होते आणि दीप्ती नवल मुंबईत होती. तेव्हा प्रकाश यांनी स्वतः त्या मुलीला सुमारे एक वर्ष वाढवले. ते स्वतः तिला आंघोळ घालायचे, दूध पाजायचे आणि नंतर तिला कामावर घेऊन जायचा. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी चित्रपट सोडून पटनाला जाण्याचा निर्णय घेतला. ते पटनाला आले. तिथे प्रकाश झा यांनी एक एनजीओ स्थापन केले. तिथे त्यांची आई त्या मुलीची काळजी घ्यायची. मुलीला सक्षम बनवले, आज दिशा झा नाव कमावत आहेप्रकाश झा यांनी सांगितले होते की, त्यांची मुलगी दिशा ४ वर्षांची झाल्यावर त्यांच्यात खरा संबंध निर्माण झाला. त्यावेळी त्यांची आई वारली आणि अशा परिस्थितीत दिशाची काळजी घेणारे कोणीही नव्हते. प्रकाश झा यांच्याकडे तेव्हा कोणतेही काम नव्हते. ते फक्त एनजीओचे काम पाहत होते. त्यांनी दिशाची जबाबदारी घेतली. काही वर्षांनी, प्रकाश झा मुंबईत परतले आणि दिशाला तिथल्या एका शाळेत घातले. प्रकाश झा यांची मुलगी दिशा ही चित्रपट निर्माती आहे.प्रकाश झा यांची मुलगी दिशा आज काय करते हे तुम्हाला माहिती आहे का? दिशा झा काही चित्रपट निर्मितींमध्ये सहाय्यक म्हणून काम करत होती आणि आज ती एक चित्रपट निर्माती आहे. २०१९ मध्ये दिशाने वडील प्रकाश झा यांच्यासोबत 'फ्रॉड सैयाँ' हा चित्रपट तयार केला. दिशा झाचे 'पॅन पेपर्स सीझर एंटरटेनमेंट' नावाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. तिने अनेक चित्रपट केले आहेत. दिशाचे मुंबईत स्वतःचे घर देखील आहे. प्रकाश झा यांनी खरोखरच हे सिद्ध केले आहे की नाती फक्त रक्ताची नाते नसतात, तर भावना आणि प्रेमाची देखील असतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NQ9R3gh
No comments:
Post a Comment