मुंबई- प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आज म्हणजेच १ एप्रिल रोजी तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारी माही विज या वयातही खूपच तरुण आणि सुंदर दिसते. सोशल मीडियावर, चाहते अनेकदा अभिनेत्रीला तिच्या सौंदर्याचे रहस्य विचारत असतात. १९८२ मध्ये एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या माही विजचे मूळ गाव दिल्ली आहे. २००९ च्या 'लागी तुझसे लगन' या मालिकेत नकुशाची भूमिका साकारल्यानंतर घराघरात लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री वयाच्या १७ व्या वर्षी ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी मुंबईत राहायला आलेली. ती २००५ पासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे, ती पहिल्यांदा रेणुका चौहान आणि रक्षा कपूर यांच्यासोबत 'तू तू है वही' या गाण्यात दिसली.२००६ मध्ये, माही विजला 'अकेला' या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत पहिली भूमिका मिळाली. यानंतर, तिची कारकीर्द नवीन उंचीवर पोहोचली. त्यानंतर ती मामूटीसोबत एका मल्याळम चित्रपटात दिसली. मग सहारा वनच्या 'शुभ कदम' या मालिकेत प्रथाच्या भूमिकेत दिसली. खरंतर तिला 'लागी तुझसे लगन' मधील नकुशाच्या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली, ती मालिका भारतातील टॉप रेटेड शोपैकी एक होती. माही विजने दिल्लीतील लीलावती विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर दिल्ली विद्यापीठातून तिचे पुढील शिक्षण पूर्ण केले.मी बाबांना सांगितले होते की मी कधीही ओझे होणार नाही.मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, शोबिझ इंडस्ट्रीमध्ये कोणतेही संबंध किंवा गॉडफादर नसलेल्या, माही विजला संघर्षांचा सामना करावा लागला आहे. जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिला तिची ध्येय स्पष्ट होती. तिने तिच्या वडिलांना सांगितले की ती कधीही त्यांच्यावर ओझे होणार नाही. बऱ्याच वेळा माहीकडे भाडे देण्यासाठी पैसे नसायचे, पण वडिलांना सांगण्याची तिची हिंमत नव्हती. ती छोटे प्रोजेक्ट घ्यायची आणि त्यातून खर्चाची व्यवस्था करायची.पुढे माहीने टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता जय भानुशालीसोबत लग्न केले. त्यांना आता एक मुलगीही असून सोबतच ते आपल्या केअरटेकरच्या मुलांचाही सांभाळ करतात. माही अलीकडेच देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टवर दिसली जिथे तिने तिच्या एग्झ फ्रिझ करण्याबद्दल आणि आयव्हीएफद्वारे आई होण्याबद्दल सांगितले. तिने वयाच्या ३२ व्या वर्षी तिचे एग्झ फ्रिझ करण्यास सुरुवात केली. यासोबतच, माहीने आयव्हीएफद्वारे गर्भवती राहण्याचा प्रयत्न केला. तिचा आयव्हीएफ प्रयत्न दोनदा अयशस्वी झाला होता. तिला खूप वेदना होत होत्या. एकदा तिचा इतका रक्तस्त्राव झाला की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.मग दोन वर्षांनी तिने तिसऱ्यांदा आयव्हीएफ करून पाहिले पण इथेही तिला निराशाच मिळाली. मग माहीने ब्रेक घेतला आणि वयाच्या ३६ व्या वर्षी तिने पुन्हा आयव्हीएफचा प्रयत्न केला आणि ती गर्भवती राहिली. माहीला ती खरोखर आई होणार आहे हे मान्य करायला २० मिनिटे लागली. तिला रडू आले, मग तिला जाणवले की तिने मुलासाठी आनंदी असले पाहिजे. माहीने असेही सांगितले की लग्नानंतर तिने जयला सांगितले होते की तिला चार-पाच मुले हवी आहेत पण तेव्हा अभिनेता त्यासाठी तयार नव्हता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bceEzDC
No comments:
Post a Comment