बंगळुरु : कर्नाटकमधून डिजिटल अरेस्ट फसवणूकीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावच्या खानापूर तालुक्यातील एका वृद्ध जोडप्याने ऑनलाइन फसवणुकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या जोडप्याला ब्लॅकमेल केले जात होते. सततच्या धमक्या आणि तणावाखाली असल्याने वृद्ध जोडप्याने हे टोकाचे पाऊल उचलले. डिएगो सँटन नाझरेथ (८३ वर्षे) आणि त्यांची पत्नी फ्लेव्हियाना (८० वर्षे) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तो ख्रिश्चन स्ट्रीटचे रहिवासी होता. फ्लेव्हियाना यांचा मृतदेह घराच्या आत आढळला, तर डिएगोचा मृतदेह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस तपासात असे समोर आले की, आत्महत्या करण्यासाठी आधी या जोडप्याने गोळ्या खाल्ल्या. यानंतर डिएगो यांनी विळ्याने स्वतःचा गळा कापण्याचा प्रयत्नही केला आणि नंतर पाण्याच्या टाकीत उडी मारली. डिएगो हे महाराष्ट्र सरकारमधून अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली. त्या चिठ्ठीत त्यांनी लिहिले की, जानेवारीपासून काही लोक नवी दिल्लीतील दूरसंचार अधिकारी असल्याचे भासवून त्यांना त्रास देत होते. डिएगोने चिठ्ठीत पुढे असेही लिहिले की, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हेगारीची कारवाई करण्यासाठी त्यांच्या मोबाईल सिम कार्डचा वापर केल्याचा आरोप आहे. यामुळेच डिजिटली अटक करण्याची धमकी देण्यात आली. या चिठ्ठीत सुमित बिर्रा आणि अनिल यादव नावाच्या व्यक्तींचा उल्लेख आहे. ज्यांनी जोडप्याकडून ५ लाख रुपये लाटले होते. डिएगोंच्या चिठ्ठीत असेही म्हटले आहे की, त्यांनी कर्ज फेडण्यासाठी त्यांची मालमत्ता देखील विकली. तर गोवा आणि मुंबईतील ओळखीच्या लोकांकडून सोने आणि मैत्रीपूर्ण संबंधातून कर्जही घेतले होते. हेच कर्ज आता त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून फेडली जावीत, असेही त्यांनी लिहिले.बेळगावचे पोलिस अधीक्षक (एसपी) भीमाशंकर गुलेड यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. तर कोणत्याही संशयास्पद कॉलची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाला की या प्रकरणात दुर्दैवाने त्या जोडप्याने शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना याबद्दल काहीच माहिती दिली नाही.पोलिसांनी डिएगोंच्या घरातून मोबाईल फोन, एक सुसाईड नोट आणि एक कोयता जप्त केला आहे. डिएगोंनी हा विळा वापरला असल्याची दाट शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. जोडप्याच्या इच्छेनुसार, त्यांचे मृतदेह BIMS मेडिकल कॉलेजला दान करण्यात आले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करता येऊ शकेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1I7OjdV
No comments:
Post a Comment