कराची : एकेकाळी पाकिस्तानचे भूषण समजल्या जाणाऱ्या बाबर आझमने एक मोठा धक्का दिला आहे. बाबर आझमने यावेळी बदला घेताना पाकिस्तानची जगासमोर लाज काढल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानवर ओढवली मोठी नामुष्की..
पाकिस्तानवर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठी नामुष्की ओढवली होती. कारण पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला होता. त्यानंतर भारातने सेमी फायनल जिंकल्यावर ऑस्ट्रेलियावर नामुष्की ओढवली. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असूनही त्यांच्या देशात फायनल झाली नाही. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार चर्चेत आला आहे. कारण आता बाबर आझमने पाकिस्तानची जगासमोर लाज काढली आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानचा मोठा निर्णय..
चॅम्पियन्स ट्रॉफीतील नामुष्कीनंतर पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका खेळवण्यात येणार होती. या संघाची निवड करताना पाकिस्तानने सर्वांनाच धक्का दिला होता. कारण पाकिस्तानने यावेळी बाबर आझम, मोहम्मद रिझवान, नसीम शाहसारख्या नामांकित खेळाडूंना वगळले होते. विश्वासाठी हा एक मोठा धक्का होता.बाबर आझमने कसा घेतला बदला...
बाबर आझमने आपल्याला संघात न घेतल्याचा चांगलाच बदला घेतला आहे. भारतासारखेच पाकिस्तानमध्येही क्रिकेट खेळवले जाते. जे खेळाडू भारतीय संघात नसतात त्यांना रणजी क्रिकेट स्पर्धा खेळावी लागते. आता असा नवीन नियमच बनवण्यात आला आहे. पण आता बाबरने चांगलाच बदला घेतला आहे. पाकिस्तानमध्ये नॅशनल टी २० चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. या पाकिस्तानमधील स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय आता बाबर आझमने घेतला आहे. त्यामुळे आता बाबरने आपल्याला संघात घेत नसाल तर स्थानिक क्रिकेटही खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बाबरसारखे खेळाडू जर नॅशनल स्पर्धेत खेळणार नसतील तर ती पाकिस्तानसाठी मोठी नामुष्की आहे. त्यामुळे बाबरच्या एका निर्णयामुळे आता पाकिस्तानचे जगासमोर नाक कापले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं चाललंय तरी काय, हे अनाकलनीय आहे. कारण एकिकडे क्रिकेट मंडळ खेळाडूंना धक्का देत असताना खेळाडू देखील त्यांची लाज काढताना दिसत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sZ1Q8Ag
No comments:
Post a Comment