Breaking

Wednesday, March 12, 2025

'पहिलं नाटक, पहिलं नामांकन आणि पहिला पुरस्कार', मटा सन्मान जिंकल्यानंतर अभिनय बेर्डेची खास पोस्ट https://ift.tt/Pt650Aw

मुंबई: कलाकार मंडळी ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो ' २०२५' ११ मार्च रोजी पार पडला आणि यंदा या सोहळ्याचे २५वे वर्ष होते. गेली २५ वर्ष गुणवंत कलाकार आणि उत्तमोत्तम कलाकृतींचा सन्मान या सोहळ्यामध्ये केला जातो. या सोहळ्यात ज्या कलाकारांनी पुरस्कार मिळवले, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. 'मटा सन्मान २०२५'मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता- व्यावसायिक नाटक विभाग' या पुरस्कारावर अभिनेता अभिनय बेर्डेने नाव कोरले. तो या सोहळ्यात अनुपस्थित होता, पण त्याच्या वतीने त्याची बहीण स्वानंदी बेर्डे आणि सहकलाकार पुष्कर श्रोत्री यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनयने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या. अभिनयने अशी पोस्ट लिहिली की, 'पहिलं नाटक, पहिलं नामांकन आणि पहिला पुरस्कार. '' ह्या माझ्या नाटकाने मला एक अभिनेता म्हणून खूप काही दिलं, उत्तम सहकलाकार, एक उत्तम भूमिका आणि अनेक लहान चिमुकले रसिक प्रेक्षक, पण त्याच बरोबर माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन आणि जसं आपण एखाद्या लहान मुलाला हाताने धरून चालायला शिकवतो तसंच माझा हात धरुन मला स्टेजवर विश्वास देणारी , माझी प्राची आई मुग्धा गोडबोले, माझ्या गोष्ठीतले माझे २ 'अ' पुष्कर श्रोत्री आणि अभिजीत केळकर आणि आमचा क्यूट विलन जयवंत वाडकर, त्याच बरोबर सतत आमच्या पाठीशी राहणारे आमचे निर्माते दिलीप जाधव, खुशबू आणि आमचे सूत्रधार प्रणीत बोडके.' त्याने पुढे लिहिले की, 'खरंतर माझ्याहुन जास्त आनंद माझ्या ह्या खूप कमी वेळात मिळालेल्या फॅमिलीला झालाय आणि हे पुरस्कार ह्या टीमशिवाय शक्य नाही. ह्या संपूर्ण टीमने मला आजपर्यंत जो पाठिंबा दिलाय आणि जे भरभरून माझं कौतुक केले आहे, त्यासाठी देईन तितक्या पार्ट्या कमी आहेत, पण लवकरच देईन ह्याची खात्री देतो. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, मी मुंबईत नसताना माझ्या वतीने हा पुरस्कार घ्यायला गेलेली माझी लाडकी बहीण स्वानंदी, जी खरंतर आमच्या घरची ‘akku’ आहे, ती आणि माझी आई ह्या दोघी ही माझे सगळ्यात मोठे सपोर्ट सिस्टम आहेत आणि ह्या पुरस्कारातच नाही तर येणाऱ्या प्रत्येक पुरस्कारामध्ये ह्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मुंबई टाइम्सचे खूप खूप आभार'. अभिनयने स्वानंदी आणि पुष्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारताचा व्हिडिओ या पोस्टसह शेअर केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tujIwh1

No comments:

Post a Comment