
अमुलकुमार जैन, उरण: महाराष्ट्र सहित रायगड जिल्ह्यात धुळवडीची धामधूम असताना रायगड जिल्ह्यातील भेंडखळ गावानजीक असणाऱ्या द्रोणगिरी नोड येथे असणाऱ्या तलावात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घनश्याम संतराम जयस्वाल (वय ३२ वर्ष, व्यावसाय- चालक रा. ५३८ केए/१४५०, सीतापुर रोड त्रिवेणी नगर २, पोस्ट- निराळा नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश ) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १४ मार्च रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली असल्याची माहिती मयत घनश्याम संतराम जयस्वाल यांनी उरण पोलिस ठाण्यात दिली आहे.
धुळवड साजरी करुन मित्रांसोबत तलावात गेला होता
शुक्रवारी (१४ मार्च) रोजी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करून झाल्यानंतर उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील तलावात घनश्याम संतराम जयस्वाल हा त्याचे मित्र मुकेश चौधरी, दिनेश यादव, अमरजीत यादव यांच्यासोबत आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, मयत घनश्याम जयस्वाल याला तलावाच्या पाण्याचा अंदाज न घेता आल्यामुळे बुडाला. त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो बेशुद्ध पडला. हे लक्षात येताच त्याला उरण येथील रुग्णवाहिकेतून इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे आणले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. मृत घनश्याम जयस्वाल धुळवडीच्या दिवशी अंगोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, ही त्याची आयुष्याची शेवटची अंघोळ या तलावात झाली असल्याचं पाहून मित्रमंडळी यांनी हळहळ व्यक्त केली. हा तरुण भारत गॅस या प्रकल्पात येणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम पाहत होता. या घटनेची माहिती उरण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. याबाबत उरण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने जयस्वाल कुटुंबाला मोठा धक्का बसला असून होळीचा आनंद शोकात बदलला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PbIvYEZ
No comments:
Post a Comment