Breaking

Monday, March 17, 2025

८६९००००००० रुपयांचा पाकिस्तानला बसला मोठा फटका, चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे कसे झाले कंगाल पाहा... https://ift.tt/9SxoM4B

संजय घारपुरे : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही पाकिस्तानच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाही. कारण आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावरही पाकिस्तानवर मोठी नामुष्कीची वेळ आली आहे. कारण पाकिस्तान आता चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे कंगाल झाल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानाला कोणती गोष्ट नडली...

पाकिस्तानात स्पर्धेतील दहाच सामने झाले. मात्र, या स्पर्धेसाठी कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडीतील रावळपिंडी स्टेडियमचे नूतनीकरण केले. यासाठी पाक बोर्डाने १० कोटी डॉलर खर्च केले. सुरुवातीला या मैदानाच्या दुरुस्तीचा खर्च केवळ ४ कोटी डॉलर होता. नूतनीकरण वेळेत झाले नाही. नंतर कर्ज काढून पाण्यासारखा पैसा खर्च केला. हीच गोष्ट पाकिस्ताननला नडल्याचे आता समोर आले आहे.

यजमान म्हणूव पाकिस्तानला किती पैसे मिळाले...

यजमान म्हणून पाकिस्तानला केवळ ६० लाख डॉलरच मिळाले. पाक लगेचच स्पर्धेतून बाहेर पडल्याने प्रेक्षकांनी इतर सामन्यांकडे पाठ फिरवली. त्यातच भारताचे सामने दुबईत झाल्यामुळे तिकीटविक्रीतून फारशी रक्कम मिळालीच नाही. प्रायोजकांकडून मिळालेली रक्कमही तुलनेत तुटपुंजीच होती. त्यामुळे पाक बोर्डाची तिजोरी रिकामी झाली आहे.

पाकिस्तानची स्थिती सुधारणार होती, पण...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चांगलेच महागात पडले आहे. या स्पर्धेच्या संयोजनामुळे पाक बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारणार, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तीन दशकांनंतर घेतलेल्या आयसीसीच्या स्पर्धेमुळे पाक बोर्डाला ८.५ कोटी डॉलरचे (सुमारे ८६९ कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे. त्यामुळे पाक बोर्ड कंगाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानवर अशी आली नामुष्की

चॅम्पियन्स स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान झाली. या स्पर्धेसाठी भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात येण्याचे नाकारले. त्यामुळे भारताचे सामने दुबईत झाले. यात भारत-पाकिस्तान ही लढतही दुबईतच झाली. एवढेच नव्हे, तर एक उपांत्य लढत आणि अंतिम लढत दुबईतच झाली. यजमान पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर एकच सामना खेळला. त्यातही न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. गटातील बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे केवळ एक लढत खेळून पाकिस्तान स्पर्धेतून ‘आउट’ झाला.

पाकिस्तानला हे निर्णय घ्यावे लागले...

गेल्या आठवड्यात पाक बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटसाठी खेळाडूंच्या मानधनात मोठी कपात केली होती. प्रत्येक सामन्यासाठी केवळ दहा हजार रुपये देण्याचे पाक बोर्डाने ठरविले होते. त्याचबरोबर मोठ्या हॉटेलमध्ये खेळाडूंचा मुक्काम नसेल, असेही स्पष्ट केले होते. पाक बोर्ड आर्थिक अडचणीत असल्यानेच हे निर्णय पाक बोर्डाला घ्यावे लागले होते. मात्र, यानंतर पाक बोर्डावर चौफेर टीका झाली. अखेर त्यांना खेळाडूंचे मानधन वाढवावे लागले. मात्र, तेही गेल्या मोसमापेक्षा कमीच आहे. आता हे नुकसान कसे भरून काढायचे, हा मोठा प्रश्न पाक बोर्डासमोर निर्माण झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/86Ir7xo

No comments:

Post a Comment