
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका सुरू केलेल्या ट्रम्प प्रशासनाने इतर देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर निर्बंध लादण्याचे संकेतही दिले होते. याबाबत तातडीने कार्यकारी आदेश घेतल्यानंतर आता ४३ देशांसाठी तीनस्तरीय प्रवास निबंधांची तटबंदी उभारण्याची योजना त्यांनी आखली आहे. त्याला अंतिम रूप दिले जात आहे. लाल यादी, नारिंगी यादी आणि पिवळी यादी अशी या देशांची वर्गवारी प्रस्तावित करण्यात आली असून, या याद्या प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्या आहेत.लाल यादीत अफगाणिस्तान आणि भूतानसह ११ देशांचा समावेश असेल. त्यांना अमेरिकेचे दरवाजे बंद असतील. या प्रस्तावित कोणत्याही यादीत भारत आणि चोनचा समावेश करण्यात आलेला नाही. नारिंगी यादीत रशिया, पाकिस्तानसह दहा देशांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या देशांतील नागिरकांच्या अमेरिका प्रवेशावर काही प्रमाणात मर्यादा घालण्यात येतील. त्यांना विशिष्ट प्रकारच्या अल्पकालीन 'नॉन-इमिग्रेशन' व्हिसासाठी पात्र ठरवले जाईल. त्यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीची आवश्यकता असेल. पिवळ्या यादीत बहुतांश आफ्रिका आणि कॅरिबियनमधील २२ देशांचा समावेश असेल. त्यांना निबंधांना सामोरे जाण्याआधी तपासणी किवा सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी मिळेल. त्याचे पालन करण्यास अपयशी ठरल्यास त्यांचा समावेश उर्वरित दोन यांद्यांमध्ये केला जाऊ शकतो.या प्रस्तावांबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु त्याची अंमलबजावणी कधी होणार, ज्यांच्याकडे आधीपासून अमेरिकेचा व्हिसा आहे त्यांचे काय, असे अनेक प्रश्न निर्वासित आणि पर्यटकांमध्ये निर्माण झाले आहेत. या ४३ देशांपैकी पाकिस्तानचे अमेरिकेत सर्वाधिक निवासित आहेत. हा देश पिवळ्या यादीत प्रस्तावित असल्याने त्यांच्या चिंतेत भर पहली आहे, हा प्रस्ताव मसुद्याच्या टप्प्यात आहे. २० जानेवारीला ट्रम्प यांनी याबाबत कार्यकारी आदेश दिले होते. यानुसार सरकारला ६० दिवसांत हे निर्बंध करणे आवश्यक आहे. हा कालावथी पूर्ण होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत.लाल यादी : अमेरिकेत पूर्णपणे बंदीदेश : अफगाणिस्तान, भूतान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेड्युएला, येमेननारिंगी यादी : काही प्रमाणात मर्यादादेश : बेलारूस, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार, पाकिस्तान, रशिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान, तुर्कमेनिस्तानपिवळी यादी : त्रुटी दूर करण्यासाठी अवधीदेश : अंगोला, अॅटिग्वा आणि बारबुडा, बेनिन, बुर्किना फासो, कंबोडिया, कॅमरून, केप व्हेर्ड, चॅड, काँगो, रिपब्लिक ऑफ काँगो, डोमिनिशिआ, इक्वेटोरिया गिरी, गाम्बिया, लायबेरिया, मलावी, माली, मॉरिटानिया, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुशिया, साओ टोमे, व्हानुआतू, झिम्बाब्वे
या देशांबाबत प्रश्नचिन्ह
यातील अनेक देशांच्या निबंधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भूतान लाल यांदीत, तर ट्रम्प प्रशासनाद्वारे अनुकूल मानल्या जाणाऱ्या रशिया व उत्तर कोरियाना पिवळ्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता का आहे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.आधी काय झाले होते ?
ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी आखलेल्या प्रवास निर्वांना आकान देण्यात आले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ते कायमही ठेवले होते, परंतु त्यांच्यानंतर अध्यक्षपदावर आलेल्या जो बायडेन पांनी हे निर्णय रद्द केले. हा आपल्या राष्ट्रीय कर्तव्यावरणा डाग आहे. सर्वधर्मीयांचे स्वागत करण्याच्या आपल्या इतिहासाशी हे विसंगत आहे असे त्यांनी म्हटले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DK17gWh
No comments:
Post a Comment