
चंदीगढ : काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालच्या हत्येमुळे सारेच हादरले आहेत. यातच दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी ३६ तासांच्या आता आरोपी सचिनला बेड्या ठोकल्या. यातच आता पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. सचिन हिमानी यांच्या मृतदेहाची ट्रॉली बॅग घेऊन जातानाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी हा व्हिडीओ जारी केला आहे.तर सीसीटिव्ही फुटेजमध्ये नजरेस पडणारा व्यक्ती हा सचिनच असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. तर सचिनने आपला गुन्हा कबुल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तपासाची माहिती उघड केली आहे.हिमानी नरवाल यांची मोबाईल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि हत्येनंतर त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये डांबण्यात आला आणि रोहतक मधील महामार्गावरील संपला बसस्टॉपशेजारी ती सुटकेस ठेवण्यात आली. दरम्यान आरोपीने कबुलीत सांगितले होते की, 'तो मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानाचा मालक आहे. तर हिमानी आणि तो एकमेकांना जवळपास एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते आणि ते रिलेशनशिपमध्येही होते.' पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीने पीडितेचा मृतदेह सांपला बस स्टँडजवळील महामार्गावर एका सुटकेसमध्ये टाकला आणि तेथून पळून गेला. तर ती सुटकेस ओढत नेत असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दृश्य कैद झाले आहे. पोलिसांनी ती सुटकेस नंतर ताब्यात घेतली. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सचिनने हिमानीवर आरोप केले आहेत. सचिनच्या म्हणण्याप्रमाणे, सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तिने सचिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले. हैराण करणारे म्हणजे याचा व्हिडीओ हिमानी हिने बनवला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून ती सचिनला ब्लॅकमेल करत होती. तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम सचिनने हिमानीला दिली होती. ती आपल्यावर पैशांसाठी सतत दबाव टाकत असल्याचे सचिनने पोलिसांना सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aGO7Lrj
No comments:
Post a Comment