विशाखापट्टणम : आशुतोष शर्माच्या तुफानी फटकेबाजी करत दिल्लीच्या संघाला अखेरचा षटकात लखनौच्या संघावर विजय मिळवून दिला. लखनौच्या संघाने यावेळी २०९ धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची ५ बाद ६५ अशी अवस्था होती. पण त्यानंतर आशुतोष फलंदाजीला आला आणि त्याने सामनाच्या नूर पालटवला. कारण दिल्लीने हा गमावणारा सामना अखेरच्या षटकात फक्त एक विकेट राखून जिंकला.दिल्लीचा संघ २१० धावाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले. पण या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने हा सामना एकहाती फिरवला. आशुतोषने ३१ चेंडूंत ६६ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच दिल्लीला लखनौचा अखेरच्या षटकात पराभव करता आला. दिल्लीच्या संघाने लखनौना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा यावेळी लखनौच्या संघाने उचलला. एडन मार्करम शांत असला तरी मिचेल मार्शने यावेळी लखनौच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. कारण मार्शने सुरुवातीपासूनच दिल्लीच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. मार्करम बाद झाला आणि त्यानंतर निकोलस पुरन फलंदाजीला आला. पुरन आणि मार्श या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजीला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. कारण या दोघांनी प्रत्येक षटकात ११ च्या सरासरीने सातत्याने धावा वसूल केल्या. मार्श आणि पुरन जोडीने ८७ धावांची दमदार भागीदारी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी रचली. मार्शने यावेळी दमदार अर्धशतक साजरे केले आणि शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण मुकेश कुमारने मार्शला बाद केले आणि ही जोडी फोडली. मार्शने यावेळी ३६ चेंडूंत ६ चौकार आणि सहा षटकारांच्या ७२ जोरावर धावांची खेळी साकारली. मार्श बाद झाला आणि पंत फलंजाजीला आला.पंतकडून यावेळी सर्वांनाच मोठी आशा होती. कारण तो दिल्लीच्या संघाविरुद्ध खेळत होता आणि लखनौसाठी त्याचा हा पहिला सामना होता. पण पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही आणि त्याने सर्वांची निराशा केली. पण ही नाराशा जास्त काळ टिकू शकली नाही. कारण निकोलस पुरन हा धमाकेदार फटकेबाजी करत होता. फक्त ३० चेंडूंत सहा चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर ७५ धावा करता आल्या, यावेळी पुरनचा स्ट्राइक रेट हा २५० एवढा होता. पुरनच्या फटकेबाजीमुळेच लखनौच्या संघाला यावेळी २०९ धावांपर्यंत मजल मारता आली.दिल्लीच्या संघाकडून यावेळी मिचेल स्टार्कने तीन बळी मिळवले, तर कुलदीपने दोन विकेट्स घेत त्याला चांगला साथ दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OvbFdDG
No comments:
Post a Comment