Breaking

Thursday, March 20, 2025

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ, लातूरमध्ये गारपीट https://ift.tt/h5UFBOW

लातूर : महाराष्ट्रात अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने याबाबत माहिती दिली होती. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अचानक वातावरणात मोठा बदल होऊन अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्राच धडक देत थेट गारपीटचा फटका दिला आहे.लातूर जिल्ह्यातील रायगव्हाणमध्ये संध्याकाळच्या वेळेस जोरदार गारपीटसह पाऊस पडला आहे. जोरदार होणाऱ्या गारपीटमुळे जनजीवन विस्कळीत झालं. या गारपीटचा जनावरांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका जानवत होता. विशेष म्हणजे आज दिवसभरही प्रचंड ऊन होतं. पण अचानक संध्याकाळी वातावरणात मोठा बदल झाला. लातूर जिल्ह्यातील अनेक गावात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

पुढचे काही तास महत्त्वाचे

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यासाठी पुढचे 3 ते 4 तास जास्त महत्त्वाचे आहेत. कारण या ठिकाणी पुढच्या काही तासात नांदेड आणि लातूरमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, असं आवाहन हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GJCedlq

No comments:

Post a Comment