
नवी दिल्ली : बहुराष्ट्रीय कॉफी चेन स्टारबक्सला अमेरिकेतील एका न्यायालयाने दणका दिला आहे. स्टारबक्सला एका कपाबाबतीत निष्काळजीपणा केल्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. एका डिलिव्हरी ड्रायव्हरला त्यांना ५ कोटी डॉलर्स म्हणजेच ४,३४,७४,२०,००० रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. कॉफीचे झाकण व्यवस्थित बंद केला नसल्याचा आरोप आहे. नेमकं घडलं काय की कंपनीला एवढा मोठा फटका बसणार आहे, जाणून घेऊ... ड्रायव्हरने लॉस एंजेलिसमधील स्टारबक्स आउटलेटमधून कॉफी खरेदी केली होती परंतु कॉफीच्या कपचे झाकण व्यवस्थित बंद केलेले नव्हते. त्यामुळे अचानक कॉफी त्याच्या अंगावर सांडली अन् गुप्तांगालाही त्यामुळे पोळले. तो गंभीरपणे पोळला गेला आणि त्याचे गुप्तांगाची हानी झाली. गुप्तांगाच्या नसा खराब झाल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकणात स्टारबक्सवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी कॅलिफोर्नियातील एका ज्युरीने स्टारबक्सला मायकेल गार्सिया नावाच्या ड्रायव्हरला ५ कोटी डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार, गार्सियाचे वकील मायकेल पार्कर यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या गार्सियाला त्यांनी ऑर्डर केलेली कॉफी देण्यात आली, तेव्हा त्याचे झाकण व्यवस्थित बंद केलेले नव्हते. यामुळे गार्सियावर गरम कॉफी सांडली. यामुळे गार्सियाला केवळ शारीरिक वेदनाच झाल्या नाहीत तर मानसिक वेदनाही झाल्या आहेत. त्यांना निराशा, अपमान, गैरसोय, दुःख, विद्रूपता, शारीरिक हानी आणि भावनिक त्रास देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्याला योग्य ती भरपाई देण्यात यावी.स्टारबक्सने म्हटले ती ते या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करणार आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, 'आम्हाला गार्सियाबद्दल सहानुभूती आहे, परंतु या घटनेसाठी आम्हीच जबाबदार आहोत. या ज्युरीच्या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत.' आम्हाला वाटते की, भरपाई खूप जास्त आहे. कंपनी नेहमीच स्टोअरमध्ये गरम पेयांच्या हाताळणीसह, सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन करण्यास वचनबद्ध राहिलेली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/H3u9Yy5
No comments:
Post a Comment