Breaking

Saturday, March 15, 2025

गरीबीने बनवलं टेलर, ऐन विशीतच पत्नीचा मृत्यू, आर्मीतही रिजेक्ट! जिद्द न सोडता उभारला कोट्यवधींचा डोलारा https://ift.tt/s0eWNPy

मुंबई- बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेला आपल्या जबरदस्त अभिनय आणि विनोदाने चाहत्यांना हसवण्यात कधीही कसर सोडत नाहीत. त्याची विनोदी स्टाईल फारच धमाल आहे. आज तो एक यशस्वी अभिनेता आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी, राजपाल यादवने नाट्यगृहात २ वर्षांचे प्रशिक्षण घेतले, त्यानंतर तो मुंबईत आला. पण प्रशिक्षण घेऊनही, अभिनेत्याला लगेच काम मिळाले नाही. यामागील कारण म्हणजे त्याची कमी उंची. आज राजपाल त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करतोय. त्यानिमित्त त्याच्या करिअरबदद्दल जाणून घेऊ. एका मुलाखतीत जुन्या संघर्षाच्या दिवसांबद्दल राजपाल म्हणाला होता की त्यांच्याकडे बसमध्ये प्रवास करण्यासाठीही पैसे नव्हते. कसे तरी, त्याने स्वतःला आधार दिला. मग १९९९ मध्ये त्याचे आयुष्य हळूहळू पुन्हा रुळावर आले. २००० मध्ये आलेल्या 'जंगल' चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने 'सिप्पा' या दरोडेखोराची भूमिका साकारली. या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका फार मोठी नव्हती, पण त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. मग काय... या चित्रपटानंतर राजपाल यादवचे नशीब बदलले आणि त्याला एकामागून एक चित्रपट मिळू लागले. राजपालला देशाची सेवासुद्धा करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने आर्मी भरतीचा प्रयत्न देखील केलेला पण कमी उंचीमुळे तिथे तो रिजेक्ट झाला. राजपाल यादवने त्याच्या आयुष्यात असा एक काळ पाहिला आहे जेव्हा त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हते. त्याच्या घराची परिस्थिती खूपच बिकट होती. राजपाल यादवचे वडिलांनी कुस्ती खेळायचे आणि त्याला दुसऱ्या गावातील एका चांगल्या शाळेत शिक्षण दिले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, घरखर्चात हातभार लावायचा, म्हणून राजपालने शिवणकाम देखील शिकले. तो शिंपी म्हणून काम करायचा, पण त्याला शिंपीकाम आवडत नव्हते. कारण त्याला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. मग त्याने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि कठोर परिश्रमानंतर आज तो विनोदी सुपरस्टार बनला आहे. राजपाल यादवने टेलरिंगचे काम केल्यानंतर लग्न केले होते. तो त्याचे आनंदी जीवन जगत असताना त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजपाल केवळ २० वर्षांचा असताना त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, जिच्यापासून त्याला एक मुलगी देखील आहे. खरंतर, १९९१ मध्ये राजपाल यादव घराबाहेर होता तेव्हा त्याची पत्नी गर्भवती होती. पण अचानक त्याला त्याची पत्नी गेल्याची बातमी मिळाली. यानंतर, राजपाल यादवने रंगभूमीकडे लक्ष वळवले. राजपाल यादवचे असे अनेक उत्तम चित्रपट आहेत, जे तुम्हाला खळखळून हसवतील. यामध्ये 'मालामाल', 'हंगामा', 'अपना सपना मनी मनी', 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'फिर हेरा फेरी', 'ढोल', 'मुझसे शादी करोगी', 'गरम मसाला' आणि 'भूतनाथ', भुलभुलैया २ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/P7NHeT3

No comments:

Post a Comment