Breaking

Thursday, March 6, 2025

४०० कोटींचे मालक, महिना कमाई ३ कोटी, तरीही घेतलं नाही स्वत:चं घर, भाड्याच्या घरातच संसार https://ift.tt/SGaVJEF

मुंबई- बॉलीवूडचे उत्कृष्ट अभिनेते अशी ओळख असलेल्या यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता. ते मूळचे शिमलाचे आहे. करिअर घडवण्यासाठी ते मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. अनुपम खेर यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. मात्र वयाच्या २५ वी मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अनुपम खेर यांनी निर्माते दिग्दर्शक महेश भट यांच्या सारांश या सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी आपल्या वयापेक्षा भरपूर मोठी भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. अनुपम खेर हे सध्या एका सिनेमात काम करण्यासाठी तब्बल ३ ते ५ कोटी रुपये फी घेतात. त्यांनी आजवर ५०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करा प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते वर्षाला अंदाजे ३० कोटी रुपये कमावतात तर त्यांची महिना कमाई ही साधारण अडीच ते तीन कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे एकूण नेटवर्थ ४०५ कोटी रुपये आहे. अनुपम खेर यांच्या बद्दल एक विशेष गोष्ट बोलायचे झाल्यास ते एवढ्या गडगंज संपत्तीचे मालक असले तरीही त्यांच्याकडे मुंबईत स्वतःचे घर नाही ते अजूनही भाड्याच्या घरातच राहतात. यामागचे कारण सांगताना त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आपल्याला आपण हयात असेपर्यंत मुलांनी काहीतरी दिले पाहिजे, मेल्यानंतर जर त्यांना घर दिल तर काय कामाचं! पण शिमला मध्ये त्यांनी आपल्या आईसाठी एक घर खरेदी केलं आहे. तसेच त्यांच्या पत्नीचे सुद्धा चंदिगड येथे एक घर आहे. अनुपम खेर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी द काश्मीर फाइल्स, दिल, सारांश, हम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, उंचाई,द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर, कुछ कुछ होता है, हम आपके है कौन, कागज २ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NbemriA

No comments:

Post a Comment