
लखनऊ : उत्तरप्रदेशातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मनियारी पोलीस ठाणे हद्दीत एका प्रियकराने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. तरुणाने आपल्या पाच मित्रांना घरी बोलावले आणि प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाहीतर नराधमांनी या प्रकाराचा व्हिडिओ देखील शूट केला आणि तिला हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचीही धमकीही दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना एक मार्चला घडली आहे. पीडितेची आई तिच्या मोठ्या मुलीच्या उपचारासाठी कच्ची पक्की येथील रुग्णालयात गेली होती. तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. याचा फायदा घेत तिचा प्रियकर घरी आला आणि तिला फसवून घराच्या मागे घेऊन गेला. तिथे आधीच उपस्थित असलेल्या त्याच्या पाच मित्रांनी मुलीला ओलीस ठेवले आणि तिला मारहाण केली. मुलीने ओरडल्यावर प्रियकराने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार देखील केला. यावेळी त्यांनी या घटनेचा व्हिडिओही शूट केला. भयभीत झालेल्या पीडित मुलीने कोणासमोरही याबद्दल वाच्यता केली नाही. पण जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा मनियारी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने कारवाई केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी, ग्रामीण एसपी विद्या सागर, एसडीपीओ २ आणि एफएसएल टीमने घटनास्थळी धाव चौकशी सुरु केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर विपिन आणि त्याचा मित्र विकास यांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिस छापे टाकत आहेत.ग्रामीण एसपी विद्या सागर यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी किशोरीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर तिचा जबाब न्यायालयात नोंदवला जाईल. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9OHqKNa
No comments:
Post a Comment