
म.टा.प्रतिनिधी, नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी (दि.१) सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आणि साडेनऊ वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये जाणवले. वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.पेठ, सुरगाणासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शनिवारी सकाळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, ठाणपाडा, कुळवंडी गावांत ३.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गेल्या महिनाभरातील ही चौथी ते पाचवी घटना असल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर भूकंपाचे केंद्र शोधून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे स्थानिक नागरिक भूकंपाच्या धक्क्यांनी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे मेरीतील भूकंपमापन यंत्रावर अनेक सौम्य धक्क्यांची नोंद होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मेरीतील भूकंपमापन वेधशाळेत डिजिटल यंत्र बसविण्याची मागणीही केली जात आहे.अहवालाचे काय? पेठ, सुरगाणा तसेच त्र्यंबकेश्वरमधील काही भागांत वारंवार बसत असलेल्या सौम्य धक्क्यांची दखल राज्य शासनानेही घेतली आहे. याचा अभ्यास करण्यासाठी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे भूगर्भतज्ज्ञ नाशिकमध्ये दाखल झाले होते. संबंधित गावांना भेट देत त्यांनी माहितीही घेतली. १४ फेब्रुवारीपर्यंत ही माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, महिना उलटूनही अद्याप अहवालाची प्रतीक्षा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VUH7FT5
No comments:
Post a Comment