Breaking

Friday, March 21, 2025

सचिन तेंडुलकर-बिल गेट्स यांच्यात रंगला भन्नाट सामना, नेमका खेळ कोणता खेळले, पाहा व्हिडिओ.. https://ift.tt/WB8MSau

मुंबई : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे एका सामन्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सचिन आणि बिल यांच्यात भन्नाट सामना रंगला. पण यावेळी हे दोघे नेमका कोणता खेळ खेळले, हे व्हिडिओ पाहून सांगता येऊ शकते. सचिन आणि बिल गेट्स यांचा हा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बिल गेट्स आणि सचिन हे टेनिसच्या कोर्टात पाहायला मिळतात. बिल गेट्स तर टेनिस खेळत होते. सचिनच्या हातात टेनिसचे रॅकेट तर होते, पण सचिन हा क्रिकेटमध्ये फलंदाजीला उभे राहतात, तसा उभा राहीला होता. यावेळी बिल गेट्स यांनी सचिनला सवाल केला की, तु नेमकं काय करत आहेस. त्यावेळी सचिन म्हणाला की, मी टेनिस नाही क्रेनिस खेळत आहे, याचा अर्थ हातात टेनिसचे रॅकेट असेल पण तो क्रिकेटसारखी फलंदाजी करेल. सचिनने त्यानंतर जोरदार फटकेबाजी केली आणि तिथे असलेल्या पंचांनी षटकारही घोषित केले. हे सर्व पाहून बिल गेट्स अचंबित झाले होते. पण त्यानंतर सचिनने त्यांना काही गोष्टी समजवून सांगितल्या.बिल गेट्स आणि सचिन यांच्यामध्ये त्यानंतर क्रिकेटचा सामना टेनिस कोर्टवर पाहायला मिळाला. सचिनने यावेळी बिल गेट्स यांना गोलंदाजी केली. सचिनच्या गोलंदाजीवर बिल गेट्सने यावेळी दमदार फटकेबाजी केली आणि षटकारही वसूल केले. यावेळी सचिन आणि बिल गेट्स यांनी खेळाचा चांगला आनंद लुटला. पण यावेळी सचिन आणि बिल गेट्स हे फक्त खेळण्यासाठी एकत्र आले नव्हते, तर ते एका कामासाठी एकत्र आले होते.सचिन आणि बिल गेट्स या दोन्ही महान व्यक्ती आहेत. पण त्यांची महानता जशी त्यांच्या क्षेत्रात आहे, तशी ती सामाजिक बांधिलकी जपण्यातही आहे. सचिन आणि बिल गेट्स यांनी गरजूंसाठी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. सचिन आणि बिल गेट्स हे या फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हे दोघे या फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र आले असून आता एक नवीन सुरुवात ते करतील, असे म्हटले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bd3CGF4

No comments:

Post a Comment