लखनऊ : लग्नात मानापमनाच्या गोष्टी सहसा घडतच असतात. पण उत्तरप्रदेशातून एका लग्नातील हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. लग्नातील एक छोटासा विधी मोठ्या वादाचं कारण ठरलं आहे. गोष्ट होती बूट चोरण्याच्या विधीची. पण याच विधीमुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. मेव्हणीला बूट चोरल्याचे कमी पैसे देऊन नवरदेवाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधून वाद पेटला आणि जोरदार हाणामारी सुरु झाली.वृत्तानुसार, डेहराडून येथे वास्तव्यास असणाऱ्या निसार अहमद यांच्या मुलगा मोहम्मद साबीर याचे उत्तरप्रदेशच्या गढमलपूर मधील खुर्शीद यांच्या मुलीशी लग्न जुळले आणि थाटात पार ही पडले. शनिवारी लग्नाची थाटामाटात वरात निघाली, लग्नाचे विधी सुरु होते. आणि वातावरण देखील उत्साहाचे होते. यादरम्यान बूट चोरण्याचा विधीही झाला. रितीप्रमाणे मेव्हणीने नवरदेवाचे बूट चोरले आणि बदल्यात थेट ५० हजार मागितले. पण नवऱ्याने फक्त ५ हजार देण्याचे मान्य केले. या कारणाने मग वादाची ठिणगी पडली. वधूपक्षातील महिलांनी वराला भिकारी म्हणून डिवचले. आणि वर पक्षाकडील लोकही संतापले. वाद इतका शिगेला गेला की काही वेळातच भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाले. काठ्या आणि दगडांचाही वर्षाव झाला. वाद चिघळला आणि वऱ्हाडींना खोलीत बंद देखील करण्यात आले. आमच्यावर हुंड्यासाठी अपमानास्पद गोष्टी कऱण्यात आल्या, असा वर पक्षाचाही आरोप आहे. तर वधू पक्षाचा आरोप आहे की, वर पक्षातील लोकांनी आम्ही दिलेल्या सोन्याच्या दागिंन्यावरुन आम्हाला टोमणे मारले. तर वधूशी देणंघेणं नसून फक्त पैशांवर प्रेम आहे, असेही वरपक्षाकडून बोलण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dFng4H3
No comments:
Post a Comment