केरळ: एका आयटी कंपनीतील २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने कामाच्या दबावामुळे आपली जीवनयात्रा संपवली आहे. मधील कोट्टायम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा कक्कनड येथील एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. आयुष्य संपवण्यापूर्वी याकूबने आपल्या आईला एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने तिला सांगितले होते की तो कामाचा दबाव सहन करू शकत नाहीये.कोट्टायम येथे शनिवारी सकाळी एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने कामाच्या दबावामुळे आपल्या आयुष्याची अखेर केली. जेकब थॉमस हा कोट्टायम येथील कांजीकुझी येथील रहिवासी आहे. जेकब ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, त्याने तेथून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. कामाचं दडपण सहन होत नसल्याचे जेकबने त्याच्या आई-वडिलांना अनेकदा सांगितले होते. शनिवारी पहाटे २ वाजता जेकबने आपल्या आईला यासंदर्भात एक व्हिडिओ मेसेजही पाठवला होता.व्हिडिओ मेसेजमध्ये जेकबने कामाचा ताण सहन होत नसल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्याने फ्लॅटवरून उडी घेतली. खाली पडताच तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या खोलीत एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण असून त्याला झोपायलाही वेळ मिळत नाही, अशा गोष्टी लिहिल्या होत्या. जेकब थॉमस हा कक्कनड येथील एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेकबने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम सुरू केले. काम सुरू केल्यानंतर सुमारे चार महिन्यांनी तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
मुलगा झोपतही नव्हता
तरुणाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांच्या मुलावर कामाचा इतका दबाव होता की त्याला झोपही येत नव्हती. या घटनेबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. मुलगा गमावल्याने कुटुंबात शोकाकुल वातावरण आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8ulc7Fz
No comments:
Post a Comment