Breaking

Wednesday, April 23, 2025

रोहितचा नाद करायचा नाय... पुन्हा एकदा भन्नाट खेळीने मुंबईचा विजय, हैदराबादवर नामुष्कीची वेळ https://ift.tt/76EMzOY

हैदराबाद: रोहित शर्मा एका फॉर्मात आला की त्याचा नाद करायचा नाही, हे पुन्हा एकदा पाहायला मिलाले. गेल्या सामन्यात रोहितच्या बॅटचा गंज उतरला होता. त्यानंतर आजच्या vs MI सामन्यात त्याने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हैदराबादच्या संघाने हेन्रीच क्लासिनच्या अर्धशतकाच्या जोरावर १४३ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दणदणीत खेळी साकारली आणि त्यामुळे मुंबईने सलग चौथा सामना जिंकला. रोहित शर्माने यावेळी ४६ चेंडूंत ७० धावांची मॅचविनिंग खेळी साकारली, तर सूर्यकुमार यादवने नाबाद ४० धावा करत त्याला सुयोग्य साथ दिली. मुंबईने यावेळी हैदराबादवर सात विकेट्स राखून मोठा विजय मिळवला.हैदराबादच्या १४४ धावांचा पाठलाग करताना मुंबईला चांगली सुरुवात करता आली नव्हती. कारण सलामीवीर रायन रिक्लेटन हा लवकर बाद झाला, त्याने ११ धावा केलया. त्यानंतर फलंदाजीला आलेला विल जॅक्सही जास्त धावा करू शकला नाही, त्याला २२ धावांवर समाधान मानावं लागलं. एका बाजूने विकेट्स पडत असल्या तरी रोहित शर्मा मात्र यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत राहीला. रोहित शर्माने यावेळी हैदराबागचा कर्णधार पॅट कमिन्सचा चांगलाच समाचार घेतला. रोहित शर्माने यावेळी दमदार फटकेबाजी केली आणि आपले ऐटीत अर्धशतक साकारले. रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. रोहितला यावेळी सूर्यकुमार यादवची चांगली साथ मिळाली. त्यामुळेच भारताला हा विजय साकारणे सोपे झाले.मुंबईने टॉस जिंकला आणि हार्दिकने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकला यावेळी मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली साथ दिली. सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना मुंबईच्या गोलंदाजांनी लवकर बाद केले. इशान किशनला तर यावेळी आपण आऊट आहोत की नाही, हेच समजले नाही आणि तो मैदानाबाहेर पडला. हैदराबादची ५ बाद ३५ अशी अवस्था होती. त्यावेळी क्लासिन त्यांच्या मदतीला आला. क्लासिनने ७१ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.मुंबई इंडियन्सकडून यावेळी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक चार बळी मिळवले, तर दीपक चहरने दोन विकेट्स पटकावल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5sHAnli

No comments:

Post a Comment