Breaking

Wednesday, April 23, 2025

मुंबई इंडियन्सला विजयानंतर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर नेमकं काय घडलं पाहा.. https://ift.tt/Yu3EBCr

हैदराबाद: मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचे त्यांच्याच घरच्या मैदानात पानीपत केले. रोहित शर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हा सामना सहजपणे जिंकला आणि चाहते आनंदीत झाले. पण हा सामना संपला आणि त्यानंतर त्यांना अजून एक गुड न्यूज मिळाल्याचे पाहायला मिळाले.मुंबई गोलंदाजी आणि फलंदाजीत भन्नाट कामगिरी केली. रोहित शर्मामे धमाकेदार फटकेबाजी केली आणि आपल्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले, पण दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय ठरला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे.मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात जेव्हा विजय साकारला तेव्हा त्यांनी आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या खात्यात आठ सामने होते. मुंबईने या आठ सामन्यांमध्ये चार विजय साकारले होते, तर चार सामन्यांत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता मुंबईच्या संघाने हैदराबादला पराभूत केले. हैदराबादच्या संघाला पराभूत केल्यावर मुंबई इंडियन्सला दोन गुण मिळाले. या दोन गुणांसह मुंबई इंडियन्सचे आता १० गुण झाले आहेत. पण मुंबईचे १० गुण झाले असले तरी एक गुड न्यूज त्यांना त्यानंतर मिळाली आहे. कारण मुंबईचा संघ या सामन्यापूर्वी सहाव्या स्थानावर होता, या विजयानंंतर त्यांनी चक्क तिसऱ्या स्थानावर मोठी झेप घेतल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टीमुळे मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच सुखावलेले असतील. त्यामुळे मुंबईने जर कामगिरीत सातत्य राखले तर त्यांना आता प्ले ऑफमध्ये पोहोचता येऊ शकते, असे दिसत आहे. एखादा संघ जेव्हा मोठा विजय साकारतो तेव्हा त्यांना नक्कीच फायदा होतो आणि हीच गोष्ट या सामन्यातही पाहायला मिळाली. मुंबईने यावेळी सात विकेट्स राखत हैदराबादवर मोठा विजय साकारला आणि त्यामुळेच त्यांना दोन गुण तर मिळाले, पण त्यांची धावगती चांगलीच वधारली. त्यामुळे या विजयाचा दोनपटीने फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/frEcb3G

No comments:

Post a Comment