पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी उष्णता दिसतंय. मुळात म्हणजे मार्च महिन्यात होळीच्या अगोदर संपूर्ण राज्यात उष्णता वाढताना दिसली. मात्र, दुसरीकडे होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना तापमानात घट झाली आणि राज्यात अवकाळीचे सावट बघायला मिळाले. राज्यातील अनेक भागांमध्ये धुवाधार अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी गारपिट देखील झाली. गारपिटीमुळे नाशिकमध्ये फळ बागांचे मोठे नुकसान झाले. लातूरमध्येही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या आहेत. अजूनही पावसाचा इशारा कायम आहे. भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा राज्यावरील अवकाळीचे ढग दूर गेल्याचे संकेत होते आणि उष्णता वाढणार असे सांगितले जात होते. मात्र, अजूनही अवकाळीचे ढग राज्यावर असल्याचे दिसतंय. नुकताच भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस होणार असल्याचा आज अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. विदर्भात पावासाचा इशारा एकीकडे पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर दुसरीकडे मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. विदर्भात उष्णता चांगलीच वाढताना दिसतंय. विदर्भात सूर्य आग ओकतोय. पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. परभणी आणि हिंगोलीमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची इशारा देण्यात आलाय. राज्यातील उष्णता पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याचे संकेत आहेत. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यावर काही भागांमध्ये कमी हवामानाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/n6VFbi3
No comments:
Post a Comment