पुणे : पुणे पोर्शे अपघातप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या थरारक घटनेनंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोन्ही डॉक्टरवर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने केली ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत या दोहोंचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडील, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली होती. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यावर रक्ताचे नमुने बदलल्याचा ठपका होता. तर पुणे पोलिसांनी मेडिकल कौन्सिलने या दोन्ही डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मेडिकल कौन्सिलने हा मोठा निर्णय घेतला आहे.
नेमके घटना काय?
१९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन कार चालकाने भरधाव वेगात आपली पोर्शे कार चालवत एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अल्पवयीन चालक हा पुण्यातील अग्रवाल बिल्डरचा मुलगा होता. बड्या बापाचा लेकाच्या या कृत्यावर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. राजकीय हस्तक्षेपाने अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. तर घटनेतील अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहायला सांगितल्याने पुणेकर संतापले होते.डॉक्टरांवर नेमके आरोप काय?
आरोपी हा बड्या बापाचा लेक असल्यामुळे पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. अल्पवयीन चालकाऐवजी त्याच्या आईचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील या दोन डॉक्टरांनी घेतले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर या दोन्ही डॉक्टरांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या दोन डॉक्टरांसह एकूण दहा जणांना या अपघात प्रकरणात अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सर्व आरोपींना गजाआड केले. पंरंतु अशा प्रकारच्या गंभीर घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mEOsauR
No comments:
Post a Comment