मुल्लानपूर: यांच्यातील च्या सामन्यात कोलकाताला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यातील नाणेफेक पंजाबने जिंकले आणि सामनाही सहज जिंकला. पंजाबला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही केवळ १११ धावा केल्या. केकेआरला ११२ धावाही करता आल्या नाही आणि संघ ९८ धावांवर पूर्ण बाद झाला. लाजिरवाण्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे काय म्हणाला जाणून घ्या...
रहाणेने स्वतःला सर्व दोष दिला
ला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी ११२ धावांची आवश्यकता होती आणि ते सहज धावसंख्येचा पाठलाग करतील अशी अपेक्षा होती. युजवेंद्र चहल (४ विकेट्स) आणि मार्को जॅनसेन (३ विकेट्स) यांनी दमदार खेळी करत केकेआरला ९५ धावांत गुंडाळले. सामन्यानंतर, कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याच्या संघाला धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त गरज असताना चुकीचा शॉट खेळल्याबद्दल सर्व दोष स्वीकारला. अजिंक्य म्हणाला, "व्यक्त करण्यासाठी काहीही नाही. तिथे काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले. संघाचा कर्णधार म्हणून माझा दोष आहे, मी चुकीचा शॉट खेळला, तो चुकला होता पण तरीही मी दोष घेईन." तो पुढे म्हणाला "मी तिथे फलंदाजी करत होतो तोपर्यंत आम्ही २ गुणांचा विचार करत होतो. विकेट घेणे इतके सोपे नव्हते, १११ धावांचा पाठलाग करणे अजूनही शक्य होते. आम्ही खूप वाईट फलंदाजी केली. गोलंदाजांनी पृष्ठभागावर खरोखरच चांगली कामगिरी केली आणि पंजाबच्या मजबूत फलंदाजीला १११ धावांवर रोखले." सामना जिंकताच पंजाबने गुणतालिकेत ४ स्थान गाठले.हैदराबादविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पीबीकेएस या सामन्यात उतरले आणि या सामन्यात त्यांची सुरुवातच वाईट झाली कारण यजमान संघाने सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासमोर विकेट्स गमावल्या आणि त्यांचा पराभव झाला. त्यांनी त्यांच्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले आणि केकेआरला फक्त ९५ धावांत गुंडाळून पंजाब संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rPEiRzO
No comments:
Post a Comment