मुंबई- १९९४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने पहिल्यांदाच मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. यानंतर २००० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तानेही मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आणि देशाचे नाव उंचावले. बॉलिवूड अभिनेत्री आज १६ एप्रिल रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त २००० साली मिस युनिव्हर्सच्या मंचावर लारा दत्ताला विचारलेल्या प्रश्नाबद्दल जाणून घेऊ, ज्याचे उत्तर देऊन तिने किताब जिंकलाच पण सोबत तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना प्रभावितही केले. लारा दत्ता ही ब्युटी विथ ब्रेन १६ एप्रिल १९७८ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जन्मलेल्या लारा दत्ताने तिचे शिक्षण बंगळुरू येथून पूर्ण केले, त्यानंतर ती मुंबईत आली आणि येथे तिने कॉलेज शिकतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली. १९९७ मध्ये, लारा दत्ताने ग्लॅड्रॅक्स स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली आणि तिला मिस इंटरकॉन्टिनेंटल ही पदवी देण्यात आली. यानंतर, २००० मध्ये, लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला, त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००३ मध्ये, तिचा पहिला चित्रपट 'अंदाज' मोठ्या पडद्यावर सुपर डुपर हिट ठरला. याशिवाय ती पार्टनर, भागम भाग, सिंग इज ब्लिंग यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. या उत्तराने लाराने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला २००० मध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत, व्हेनेझुएलाच्या क्लाउडिया मोरेनो आणि स्पेनच्या हेलेन लिंडेससह अंतिम फेरीत होती. मिस युनिव्हर्स स्पर्धा महिलांसाठी अपमानजनक असल्याचे म्हणत बाहेर निषेध सुरू आहे, याला तुम्ही चुकीचे कसे ठरवाल. यावर लारा म्हणाली की, मला वाटते की मिस युनिव्हर्ससारख्या स्पर्धा आपल्यासारख्या तरुणींना ज्या क्षेत्रात आपण पुढे जाऊ इच्छितो त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक व्यासपीठ देते. उद्योजकता असो, सशस्त्र दल असो किंवा राजकारण असो, हे व्यासपीठ आपल्याला आपले मत व्यक्त करण्याची संधी देते, ज्यामुळे आपण आज जसे आहोत तसे मजबूत आणि स्वतंत्र बनतो. लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला तेव्हा सायप्रसमध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत निदर्शने झाली होती आणि ही स्पर्धा महिलांचा अपमान करणारी असल्याचेही म्हटले गेले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eTHODpI
No comments:
Post a Comment