नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याने आणखी एका दहशतवादी हल्ल्यासाठी नवी दिल्लीची निवड केली होती. दिल्लीच्या एका न्यायालयाने आपल्या आदेशात हे म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, राणाचा कट फक्त मुंबईपुरता मर्यादित नव्हता. हे षडयंत्र भारताच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडेही पसरले होते. तपास संस्था एनआयएला यासाठी पुरेसे पुरावे सापडले आहेत. विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजित सिंह यांनी १० एप्रिलला हा आदेश दिला. राणा यांच्यावरील आरोप राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.तहव्वूर राणा सध्या दिल्लीत एनआयए कोठडीत आहे. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. न्यायालयाने एनआयएला राणाची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. एनआयए आता राणाची चौकशी करेल आणि कटाचा विविधांगी तपास करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी १० एप्रिलला एक आदेश दिला आहे.१२ पानांच्या आदेशात न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की, रेकॉर्डवरील पुरावे दर्शवितात की, भारताच्या सीमेपलीकडे पसरला होता. कट रचणारे नवी दिल्लीसह भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याची योजना आखत होते. न्यायाधीशांनी असेही नमूद केले की, कटाची खोली जाणून घेण्यासाठी राणाची सतत चौकशी करणे आवश्यक आहे.न्यायालयाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, कटासंदर्भात साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे आणि कागदोपत्री पुरावे सादर करावेत. यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकेल. न्यायाधीशांनी असेही म्हटले की, एनआयएने दर ४८ तासांनी राणाची वैद्यकीय तपासणी करावी. वरिष्ठ वकील ज्ञानकृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी न्यायालयात एनआयएची बाजू मांडली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, तपासाचा भाग म्हणून एनआयए राणाला हल्ल्याचा कट रचलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. यामुळे तपास यंत्रणेला कटाबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. एनआयए घटनास्थळांचे नाट्यीकरण देखील करू शकते. यामुळे एनआयएला दहशतवादी टोळीबद्दल सखोल माहिती मिळू शकेल. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणा हा मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा सहकारी देखील आहे. प्रत्यार्पण करारांतर्गत राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZLiBk16
No comments:
Post a Comment