मुंबई- सुष्मिता सेनची एक्स वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री हिने नुकतेच बिकानेरमध्ये तिचे नवीन घर बांधले, या घराबद्दल तिने तिच्या व्लॉगमध्ये बरेचकाही सांगितले. अलीकडेच चारूच्या या घराची नोंदणी देखील पूर्ण झाली आहे. यापूर्वी चारू असोपाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती ऑनलाइन सूट विकताना दिसली होती. त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की अभिनेत्रीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. आता तिला सूट विकून स्वतःचे पोट भरावे लागत आहे. पण जेव्हा चारू तिच्या नवीन घरासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडली, विमानाने प्रवास करत आहे तेव्हा लोकांनी तिला खूप ट्रोल करण्यात आले. चारू असोपाला विमानातून प्रवास करताना पाहून काही लोकांनी म्हटले की, जर तिची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तिने ट्रेनने प्रवास करायला हवा होता. काहींनी चारू असोपाला गरीबही म्हटले. त्याच वेळी काही युजर्सने असेही म्हटले की, चारू विनाकारण गरिबीचा बावू करत रडत असते. पण आता चारू असोपाने त्याला चोख उत्तर दिले आहे. चारू असोपाने तिला टोमणे मारणाऱ्यांना चोख उत्तर दिले. 'ईटाइम्स' नुसार, चारू म्हणाली, 'मी तुम्हाला अपडेट करत राहते. लोकांनी कमेंट केली की मी ट्रेनने प्रवास का केला नाही, मी फ्लाइटने का प्रवास केला. तर याचे कारण म्हणजे ब्रँडने मला आमंत्रित केले आणि फ्लाइट बुक करण्याचा आग्रह धरला. काही लोकांनी माझ्या शॉपिंगचे व्हिडिओही बनवले आणि म्हटले की ती गरीब आहे. सर्वप्रथम, मी कधीही असे म्हटले नाही की मी गरीब आहे. देवाच्या कृपेने, मी व्यवस्थित मॅनेज करत आहे. मला सहानुभूती नको आहे. मी इतर गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी टीव्हीवरून मुद्दाम ब्रेक घेतला आहे. हा माझा निर्णय होता.' 'बजेटमध्ये घर मिळवणे किंवा असणे सोपे नाही' तिच्या नवीन घराबद्दल पुढे म्हणाली, 'बजेटमध्ये घर मिळवणे किंवा असणे सोपे नाही. तुम्हाला बजेटमध्ये राहावे लागते आणि ते चांगले बनवावे लागते. जेव्हा तुमच्याकडे अमर्यादीत पैसे असतात तेव्हा तुम्ही काहीही निवडू शकता. पण बजेट असल्याने, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो.' कर्जावर नवीन घर खरेदी केले चारू म्हणाली की तिने कर्ज काढून घर खरेदी केले आहे. सध्या ती बँकेकडून अधिकृत कागदपत्रांची वाट पाहत आहे. ती म्हणाली, 'मी सध्या देत असलेला ईएमआय मुंबईत भरलेल्या भाड्याइतकाच आहे. दरवर्षी भाडे वाढते, परंतु ईएमआय स्थिर राहतो - हा त्याचा फायदा आहे. मी एसी खरेदी केला आहे आणि मी झियानासाठी खेळण्याची जागा बनवत आहे. माझ्याकडे एक चांगला फ्रिज आहे, पण तो महाग आहे, म्हणून मी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी इतर गोष्टी कमी करेन. मला अजूनही गिझर आणि व्हॅक्यूम क्लिनरची आवश्यकता आहे. मी माझ्या क्षमतेनुसार हळूहळू खरेदी करत आहे.' सुष्मिता सेनच्या भावासोबत लग्न आणि घटस्फोट चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनशी लग्न केले, परंतु काही दिवसांनी त्यांच्यात भांडण आणि मतभेद सुरू झाले. ८ जून २०२३ रोजी त्यांचा घटस्फोट झाला. दोघेही मुलगी झियानाचे पालक आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cJsw35h
No comments:
Post a Comment