चेन्नई : युजवेंद्र चहलने महेंद्रसिंग धोनीला बाद करत हॅट्रीक घेतली आणि तिथेच पंजाबने चेन्नईला पिछाडीवर ढकलले होते. चेन्नईच्या संघाच्या सॅम करनने दणदणीत फटकेबाजी केली आणि त्यामुळेच त्यांना १९० धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठला करण्यासाठी पंजाबचा संघ उतरला आणि त्यांनी वादळी सुरुवात केली होती. श्रेयस अय्यरने यावेळी ४१ चेंडूंत ७२ धावांची धावांची दणकेबाज खेळी साकारली आणि त्यानंतर पंजाबने चेन्नईला त्यांच्याच घरात चार विकेट्स पराभूत केले. चेन्नईच्या १९१ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या प्रभसिमरनने ५४ धावांची खेळी साकारली आणि संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावलं आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईला यावेळी सॅम करनने धडाकेबाज अर्धशतक झळकावत चांगलेच सावरले. कारण चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण चेन्नईचा सलामीवीर शेख रशीद ११ धावा करू शकला, आयुष म्हात्रेला तर सात धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर बाद झाला होता. त्यामुळे चेन्नईची ३ बाद ४८ बिकट अवस्था झाली होती. त्यावेळी चेन्नईच्या मदतीला धावून आला तो सॅम करन. कारण सॅमने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि त्याने संघाची धावगती रुळावर आणली. सॅमने यावेळी धमाकेदार फटकेबाजी केली आणि आपले अर्धशत पूर्ण केले. पण त्यावर करन थांबला नाही. कारण करनने त्यानंतर तुफानी फटकेबाजी सुरु ठेवली आणि तो शतकाच्या जवळ पोहोचला. करनचे शतक यावेळी पूर्ण होऊ शकले नाही. करनला यावेळी मार्को जेन्सनने बाद केले, पण करनने यावेळी ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८८ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानंतर सर्वांचे लक्ष महेंद्रसिंग धोनीवर लागलेले होते. धोनीने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. युजवेंद्र चहलच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकारही मारला. पण त्यानंतरच्या चेंडूवरच तो झेल बाद झाला. धोनीला यावेळी ११ धावा केल्या. चहलने यावेळी धोनीसह चार विकेट्स एकाच षटकात घेतल्या आणि चेन्नईला पिछाडीवर ढकलले. पंजाबकडून यावेळी सर्वाधिक चार विकेट्स युजवेंद्र चहलने काढल्या, तर त्याला प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत अर्शदीप सिंग आणि मार्को येन्सन यांनी चांगली साथ दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ihLXG8A
No comments:
Post a Comment