पाटणा : बिहारमधून चक्रावून टाकणारे प्रकरण () समोर आले आहे. खगरिया जिल्ह्यातील मोरकाही पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव दीनदयाळ असून तो बेगुसरायचा रहिवासी होता. ज्याचा मृतदेह बछौता-अलौलिया रस्त्यावर एका वाहनात संशयास्पद स्थितीत आढळला. ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मेहुणीच्या दिलेल्या कबुलीमुळे प्रकरणाला मात्र नवे वळण मिळाले आहे.मृताच्या मेहुणीने सोशल मीडियावर कबूली देत म्हटले की, तिचे दीनदयाळशी प्रेमसंबंध होते. तिने असाही दावा केला की, त्याची बहीण साजो देवी (दीनदयाळची पत्नी) दुसऱ्या पुरुषावर प्रेम करत होती, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. मेहुणीचा आरोप आहे की, साजो देवी यांनी तिचा प्रियकर रमन कुमार राणा याच्यासोबत मिळून दीनदयाळची हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी दीनदयाळचा भाऊ संजीव कुमारने मोरकाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये दीनदयाळची पत्नी, सासू अनिता देवी, सासरे टुनटुन साह आणि कथित प्रियकर रमन कुमार राणा यांच्यासह अनेक लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
गाडीत आढळला होता मृतदेह
१४ एप्रिलला दुपारी १२:१७ वाजता पोलिसांना अशी माहिती मिळाली की, एका तरुणाचा मृतदेह खड्ड्यात पडला आहे. पण जेव्हा तपास अधिकारी राजू कुमार घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेह एका कारमध्ये आढळला. जो मृताच्या मामाच्या मुलाचा असल्याचे सांगितले जात आहे. शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत, परंतु व्हिसेरा शवविच्छेदनासाठी जतन करण्यात आला आहे. तपास अधिकारी राजू कुमार यांच्या माहितीनुसार, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), व्हिसेराची फॉरेन्सिक तपासणी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढता येणार आहे. घटनेच्या दिवशी दीनदयाळ कामठाण येथील त्याच्या सासरच्या घरी गेला होता की नाही? याचाही पोलीस तपास करत आहेत.अलौलीचे एसडीपीओ-२ संजय कुमार म्हणाले की, हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे आणि प्रत्येक अंगाने तांत्रिक तपास केला जात आहे. मृतक आणि त्याची पत्नी कोणाशी बोलत होते? हे मोबाईल सीडीआरवरून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RLDZb90
No comments:
Post a Comment