Breaking

Wednesday, April 16, 2025

राजस्थान जिंकली असती, पण तो हिरो बनायला गेला अन् व्हिलन ठरला, Super Over कशी झाली पाहा.. https://ift.tt/2xIHSum

नवी दिल्ली : राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील सामना मध्ये गेला नसता. पण राजस्थानचा एक खेळाडू हिरो बनायला गेला आणि तोच पराभवाचा व्हिलन ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. या खेळाडूने जर हिरोगिरी केली नसती तर हा सामना राजस्थान जिंकली असती. पण या खेळाडूचा अतिशहाणपणा यावेळी राजस्थानच्या संघाला नडल्याचे पाहायला मिळाले.राजस्थानला विजयासाठी दोन चेंडूंवर तीन धावांची गरज होती. त्यावेळी हेटमायर हा फलंदाजी करत होता. तो स्ट्राइकवर असताना राजस्थानचा संघ सामना जिंकेल, असे वाटत होते. कारण तो जोरदार फटकेबाजी करत होता. या २० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हेटमायरने चांगला फटका मारला. या चेंडूवर दोन धावा सहज निघाल्या असत्या. पण हेटमायर फटका मारून दुसरी धाव घेण्यासाठी धावत आला. पण दुसरीकडे ध्रुव जुरेलने मात्र एकच धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्यास नकार दिला. यावेळी दुसरी धाव होऊ शकली असती. पण जुरेल यावेळी हिरो बनायला गेला.अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी दोन धावा हव्या होत्या. जुरेल हिरो बनण्यासाठी सज्ज होता. एकच फटका त्याला हिरो बनवू शकला असता. पण त्याला यावेळी मोठा फटका मारता आला नाही. त्याने ऑफ साईडला फटका मारला. या चेंडूवर तो धाव घेण्यासाठी धावला. पण त्याची एकच धाव पूर्ण झाली आणि तो रन आऊट होणार, हे स्पष्ट दिसत होते. घडलेही तसेच. कारण जुरेल यावेळी दुसरी धाव काढताना बाद झाला आणि तोच या सामन्यात राजस्थानसाठी व्हिलन ठरला. कारण यावेळी त्याने जर पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या असत्या तर राजस्थानला एका चेंडूत विजयासाठी एकच धाव घ्याली लागली असती आणि ते फार सोपं होतं. त्यामुळे यावेळी जुरेल हा राजस्थानसाठी व्हिलन ठरल्याचे समोर आले. चुरशीच्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी राजस्थान रॉयल्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. सुपर ओव्हरमधील ‘राजस्थान’चे १२ धावांचे आव्हान ‘दिल्ली’ने चार चेंडूंतच पार केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WFuS6tL

No comments:

Post a Comment