डोंबिवली : मनसे नेते राजू पाटील यांनी बदलापूर स्टेशनवरील व्हिडिओ एक्स हँडलवर पोस्ट केला आहे, यात बदलापूरमधील नागरिक आणि प्रवासी चेंगराचेंगरीत चालताना दिसत आहे. त्यामुळे परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरिचा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन इथे लक्ष देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजू पाटील यांची पोस्ट काय?
हा video 2 दिवसापूर्वीचा आहे, परंतु आताही परिस्थिती अशीच आहे. 'तुम्ही कसली वाट पाहताय? @drmmumbaicr' मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. या रेल्वे प्रशासनाचे थोडे जरी नियोजन चुकले तर काय परिस्थिती ओढवू शकते, त्याचं विदारक दृष्य परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरीत संपूर्ण मुंबईने पाहिलं आहे. सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पहायला मिळत आहे. प्रवाशांचा विचार न करता रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अचानक लावलेले फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्म उभारणीच्या कामात चुकलेले नियोजन धोक्याची घंटा ठरत आहेत. तरीही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? तुम्ही कसली वाट पाहताय? पुन्हा परळ-एल्फिस्टन सारख्या एखाद्या घटनेनेच प्रशासनाला जाग येणार का ??मनसे नेते राजू पाटील नेहमीच आपल्या आक्रमक शैलीत काही स्थानिक प्रश्नांना वाचा फोडत असतात. अनेकदा त्यांनी या स्थानिक प्रश्नांवरुन सरकारला घेरले आहे. आता त्यांनी बदलापूर स्थानकातील हा गर्दीचा विषय नमूद करत सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला एल्फिस्टन पूल घटनेची आठवण करुन दिली आहे. याकडे सरकारचे तसेच रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/IColJXn
No comments:
Post a Comment