नवी दिल्ली : आरसीबी आणि दिल्ली यांचा सामना चांगलाच रंगला होता. पण यावेळी सामन्यात एकच चेंडू टर्निंग पॉइंट ठरला. कारण या एका चेंडूवर कॅच सुटली आणि त्याचबरोबर रन आऊटची संधीही हुकली. त्यामुळे हा चेंडू या सामन्यात सर्वात महत्वाचा ठरला.ही गोष्ट घडली ती १६ व्या षटकात. त्यावेळी मिचेल स्टार्क हा गोलंदाजी करत होता. विराट कोहली आणि कृणाल पंड्या दमदार फलंदाजी करत होते. या षटकातील अखेरच्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. कृणाल पंड्या हा विराट कोहलीपेक्षा दमदार कामगिरी करत होता. त्यावेळी ही गोष्ट घडली आणि सामना फिरल्याचे पाहायला मिळाले.या १५ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर ही गोष्ट घडली. स्टार्कने चांगला चेंडू टाकला होता. पण कृणाल एवढ्या चांगल्या फॉर्मात होता की, त्याने या चेंडूवर मोठा फटका मारला. पण या चेंडूवर खेळताना कृणालचे टायमिंग चांगले झाले नाही. कृणालचे टायमिंग हुकले आणि हा चेंडू हवेत उडाला. त्यावेळी दिल्लीचा अभिषेक पोरेल हा सामान सहजपणे पकडेल, असे वाटत होते. कारण त्याच्या समोरच हा चेंडू आला होता. अभिषेक पोरेलने ही कॅच सोडली आणि कृणालला जीवदान मिळाले. कृणाल त्यावेळी ५२ धावांवर होता. त्याच चेंडूवर रन आऊट करण्याची संधीही दिल्लीच्या संघाला होती. पण अभिषेकने कॅच सोडली आणि तो चेंडू शोधत होता. त्यावेळी स्टार्कने त्याला लगेच चेंडू टाकायला सांगितला, पण त्याच्याकडून उशिर झाला. त्यामुळे या सामन्यात दिल्लीकडून रन आऊटची संधीही हुकली. दुसरीकडे स्टार्ककडे अभिषेकने चेंडू फेकला खरा, पण त्याला हा चेंडू पकडता आला नाही. त्यामुळे आरसीबीच्या संघाला अजून एक धाव मिळाली. त्यामुळे हा एकच चेंडू आरसीबीच्या विजयासाठी महत्वाचा ठरला.दिल्लीच्या संघाला कृणालला बाद करून आरसीबीला पराभूत करण्याची संधी आली होती. पण एकाच चेंडूवर दिल्लीच्या संघाने हा सामना गमावला. कारण या एकाच चेंडूवर दिल्लीच्या संघाने कॅच सोडली आणि रन आऊटची संधीही हुकली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/SdQLj7Z
No comments:
Post a Comment