प्रसाद रानडे, : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसानंतर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून या अपघातात पोलादपूर शहरातील एका तरुणाचा दुर्देवी रित्या मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पोलादपूर तांबडभुवन येथील एका तरूणाचा सहकुटूंब ऍक्टिव्हा स्कूटरवरून प्रवास करताना आयशर टेम्पोने स्कूटरला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेमध्ये स्कूटरस्वाराला अत्यवस्थ अवस्थेत पुढील उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रूग्णालयात तातडीने हलविण्यात येत होते. यावेळी दुर्दैवीरित्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अन्य तिघांपैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असून आई आणि मुलाची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात आले. क्रमांक 66 वरील लोहारमाळ हद्दीतील मोरया ढाब्याजवळ पोलादपूरच्या दिशेने ऍक्टिव्हा स्कूटरवरून (एमएच 06 सीजी 4955) सुनील सुरेश पवार (वय41), सुवर्णा सुनील पवार (वय 39), श्लोक सुनील पवार (13) आणि रिया सुनील पवार (10) हे चार जणांचे कुटूंब बुधवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास प्रवास करत होता. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 07 एजे 2210) मधून व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये नाकारलेले आंबे घेऊन परत येणारा अतुल अजित काळवणकर (वय 35, मिठबाव,ता.देवगड, जि.सिंधुदूर्ग) याने अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दूर्लक्ष करून डाव्या बाजूने राँग साईडने ओव्हरटेक करताना ऍक्टिव्हा गाडीच्या डाव्या बाजूला डिझेल टॅकजवळ ठोकर मारल्याने ऍक्टिव्हा चालक सुनील पवार याचा तोल गेला आणि तो आयशर टेम्पोच्या मागील टायरखाली आला. याच वेळी त्याची मुलगी रिया हिला जोरदार मार लागला आणि त्याची पत्नी आणि मुलगा यांना किरकोळ जखमा आणि मुकामार लागला. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या घटनेची माहिती कळताच पोलादपूर शहरातील जत्रोत्सवातील अनेक तरूण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे आणि पालीस नाईक शिंदे, पोलीस हवालदार सर्णेकर तसेच स्वप्नील कदम आणि कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी तातडीने हलविले. यावेळी सुनील पवार याची प्रकृती गंभीर आणि तीव्र जखमा असल्याने त्यास तातडीने माणगांव उपजिल्हा रूग्णालयामध्ये पाठविले तर लहान मुलीला कामोठेतील एमजीएम रूग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. याच कुटूंबातील मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गणेश येरूणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर चालक अतुल अजित कालवणकर याच्याविरूध्द भान्यासं 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटारवाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात प्रकरणाचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eVjpDAh
No comments:
Post a Comment