बेंगळुरु : ने एकाच षटकात सामना फिरवला आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अजून एक विजय मिळवून दिला. आरसीबीच्या संघाने तुफानी सुरुवात केली होती. पण त्यांना १६३ धावांवर समाधान मानावे लागले. हे आव्हान माफक वाटत असले तरी आरसीबीने यावेळी अचूक गोलंदाजी करत आपले आव्हान कायम ठेवले होते. पण राहुलने १५ व्या षटकात धडाकेबाज फटकेबाजी केली आणि सामना दिल्लीच्या बाजूने फिरवल्याचे पाहायला मिळाले. राहुलने या सामन्यात नाबाद ९३ धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे दिल्लीच्या संघाला आरसीबीवर त्यांच्या घरच्या मैदानात सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवता आला.आरसीबीच्या संघाने एवढी झोकात सुरुवात केली होती की, ते आता २०० धावांचा आकडा पार करतील. पण आरसीबीचे फलंदाज एकामागून एक बाद होत राहीले आणि त्यांच्या धावांचा ओघ कमी झाला. अखेरच्या षटकांत जर टीम डेव्हिडने मोठी खेळी साकारली नसती तर आरसीबीच्या संघाला १५० धावांचा पल्लाही गाठता आला नसता. आरसीबीला फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांच्याकडून चांगली सलामी मिळाली. या दोघांनी ६ षटकांत ६१ धावांची सलामी दिली होती. पण त्यावेळी सॉल्ट बाद झाला आणि ही जोडी फुटली. सॉल्टने या सामन्यात १७ चेंडूंत ३७ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली २२ धावांवर लगेच बाद झाला. कर्णधार रजत पाटीदार २५ धावा करू शकला. पण टीम डेव्हिडने २० चेंडूंत ३७ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे आरसीबीला १६३ धावा करता आल्या.आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची २ बाद १० अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर लोकेश राहुल फलंदाजीला आला आणि त्याने एकहाती सामना फिरवला. राहुल खेळत असताना दिल्लीचा ४ बाद ४८ अशी अवस्था झाली होती. पण त्याने हार मानली नाही. यावेळी १५ वे षटक दिल्लीच्या विजयात टर्निंग पॉइंट ठरले. आरसीबीचा जोश हेझलवूड हे षटक टाकत होता. या १५ व्या षटकात राहुलने तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावांची लूट केली आणि सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला.दिल्लीचा हा चौथ्या सामन्यातील सलग चौथा विजय ठरला. त्यामुळे त्यांच्या खात्यात आता आठ गुण जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये जाण्याच्या संधी वाढल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Yb8Fwl3
No comments:
Post a Comment