कोलकाता : मुंबई इंडियन्सच्या सामन्यामध्ये केकेआरला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. हा सामना अजिंक्यच्या घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर झाला होता. पण या सामन्यात केकेआरचा मोठा पराभव झाला. या सामन्यानंतर केकेआरचा संघ कसा उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण मुंबई इंडियन्सच्या सामन्याच्या पराभवामधून आपण एक मोठी गोष्ट शिकलो, असे अजिंक्य रहाणेने सामना संपल्यावर सांगितले.अजिंक्यने सामन्यानंतर सांगितले की, " हैदराबादचा सामना आमच्यासाठी महत्वाचा होता आणि हा सामना मोठ्या फरकाने जिंकलो, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. आम्ही टॉस गमावला. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करायची होती, पण फलंदाजी करावी लागली. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाला. एकामागून एक आव्हानं येत होती. पण आम्ही ही सर्व आव्हानं परतवून लावली. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात आमचा पराभव झाला होता. पण या पराभवामधून आम्ही एक गोष्ट नक्कीच शिकलो. त्यामुळे या सामन्यात आम्ही ११ षटकांपर्यंत जास्त जोखीम उचलली नाही, विकेट् गमावले नाहीत. १५ षटकांपर्यंत खेळ घेऊन जायला आणि अखेरच्या पाच षटकांमध्ये विकेट्स हातात असल्यामुळे धावगती वाढवता येते, हे आम्ही चुकांमधून शिकलो. या गोष्टीचा आम्ही अवलंब केला आणि त्यामुळेच मोठी धावसंख्या उभारू शकतो. आम्ही १७०-१८० धावा उभारू शकतो, असे वाटत होते. पण वेंकटेश आणि रिंकू यांनी दमदार फटकेबाजी केली. त्यामुळेच आम्हाला २०० धावांचा पल्ला गाठता आला. गोलंदाजांनीही या सामन्यात दमदार कामगिरी केली, त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय साकारता आला आहे. आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत. पण वरुण आणि सुनील या दोघांनीच त्यांचे काम चोख बजावले, त्यामुळे मोईनला गोलंदाजी करण्याची वेळच आली नाही. " मुंबईकडून केकेआरला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. पण या धक्क्यामधून केकेआरचा संघ सावरला. कारण केकेआरचा संघ त्यांचया चुकांमधून शिकल्याचे अजिंक्य रहाणेने सांगितले. त्यामुळे आता या विजयानंतर केकेआरचा संघ पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2kJGcuI
No comments:
Post a Comment