Breaking

Wednesday, April 2, 2025

Fact Check : लालू प्रसाद यादव यांची तब्येत अचानक बिघडली ? व्हायरल फोटोचं सत्य काय? https://ift.tt/hIkuz4L

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत लालू यादव हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावलेला आहे. सजग टीमने या व्हायरल फोटोची सत्यता तपासली आहे.फोटोसोबत काय दावा केला जात आहे? प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर ओसीन जैन नावाच्या महिलेने हा फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करताना लिहिले आहे, आता वेळ आली आहे, असे दिसते'. अशाच दाव्यासोबत राजीव कुमार सिंह आणि राम जी कश्यप यांनी सुद्धा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत किती सत्यता आहे? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोचे सत्य शोधण्यासाठी आम्ही तो फोटो गुगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला काही बातम्यांचे लिंक्स मिळाले. त्यावरून आम्हाला समजले की, लालू प्रसाद यादव यांची तब्येत ठीक नाही, हे खरे आहे. पण सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, तो जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे.सर्चमध्ये आम्हाला हाच फोटो दिसला. त्या बातमीत असे सांगितले आहे की, लालू प्रसाद यादव यांची तब्येत खूप नाजूक आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स (AIIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला आणले होते.त्यानंतर, सुद्धा आम्हाला हाच फोटो आणि तीच माहिती मिळाली. यावरून हे स्पष्ट होते की, लालू प्रसाद यादव यांचा तीन वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासोबत शेअर केला जात आहे.निष्कर्ष लालू प्रसाद यादव यांचा तीन वर्षांपूर्वीचा फोटो खोट्या दाव्यासोबत सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. सजग टीमने केलेल्या पडताळणीत हे खोटं उघडकीस आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HBXWwv9

No comments:

Post a Comment