Breaking

Friday, April 4, 2025

तिलक वर्माचा भर मैदानात केला हार्दिक पंड्याने अपमान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय... https://ift.tt/rNfjkpI

लखनौ : सामना सुरु असताना भर मैदानात हार्दिक पंड्याने तिलक वर्माचा अपमान केल्याचे पाहायला मिलाले. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते आता हार्दिकला जोरदार ट्रोल करत आहेत. यावेळी मैदानात नेमकं घडलं तरी काय, याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.हार्दिक पंड्याने या सामन्यात सुरुवातीला तिलकला संघात स्थान दिले नव्हते. पण दुसऱ्या डावात त्याने तिलकला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात स्थान दिले होते. त्यावेळीच तिलकचे मानसीक खच्चीकरणे झाले असल्याचे म्हटले जात होते. कारण तिलक एक चांगला फिल्डर आहे आणि भावी कर्णधार आहे. त्यामुळे त्याला खेळवणे भाग होते. पण हार्दिकने तसे केले नाही. पण सामना सुरु असताना तिलक जेव्हा मैदानात होता, तेव्हाही त्याचा अपमान हार्दिकने केल्याचे पाहायला मिळाले आहे.सूर्या आणि तिलक यांची चांगली जोडी जमली होती. पण सूर्या अर्धशतक झळकावल्यावर बाद झाला आणि तिलक मैदानात राहीला. त्यानंतर हार्दिक फलंदाजीला आला. हा गोष्ट घडली ती १९ व्या षटकात. त्यावेळी शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला आणि त्याने या अचूक मारा केला. हार्दिक पंड्यालाही यावेळी मोठे फटके मारता येत नव्हते. पण या षटकाच्या पाचव्या चेंडूनंतर हार्दिक पंड्याने तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक सामन्यानंतर म्हणाला की, 'तिलक प्रयत्न करत होता. पण त्याचे फटके लागत नव्हते, काही वेळा असे क्रिकेटमध्ये होते.' तिलकला यावेळ मोठे पटके मारता येत नसल्याचे पाहायला मिळत होते. पण सामना संपला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकत होता. कारण मुंबईकडे तोच अखेरचा बिनीचा फलंदाज शिल्लक होता. तिलकला संघाबाहेर करत हार्दिकने आपल्या संघावर नामुष्कीची वेळ आणली. कारण यावेळी त्याने तिलकवर अविश्वास दाखवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ही चूक हार्दिकला नक्कीच महागात पडेल, असे म्हटले जात आहे. तिलक वर्मा धडाकेबाज फलंदाज आहे. तो या सामन्यात प्रयत्न करत होता. कदाचित अखेरच्या षटकात त्याला यश मिळू शकले असते. पण त्यापूर्वीच हार्दिकने त्याला संधाबाहेर करण्याचा निर्णय घेतला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mLEz9XK

No comments:

Post a Comment