Breaking

Friday, April 4, 2025

रोहितने संघाबाहेर असूनही हार्दिकला कशी मिळवून दिले विकेट, व्हिडिओ पाहाल तर चकीत व्हाल... https://ift.tt/rNfjkpI

लखनौ : रोहित शर्माला लखनौविरुद्धच्या सामन्यासाठी संघाबाहेर केले होते. रोहितला दुखापत झाल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले होते. पण रोहितने संघाबाहरे असतानाही हार्दिक पंड्याला विकेट मिळवून दिल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले. रोहित शर्माचा व्हिडिओ हा यावेळी जोरदार व्हायरल झाला आहे.पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला एकही विकेट मिळवता आला नाही. त्यावेळी हार्दिक पंड्याला नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. रोहित शर्मासारखा अनुभवी खेळाडू संघाबाहेर होता, याची उणीव हार्दिक पंड्याला जाणवत होती. पण रोहित संघामध्ये नव्हता. पण जेव्हा संघाचा टाइम आऊट झाला तेव्हा रोहित शर्मा हा प्रशिक्षकांबरोबर मैदानात आला होता. रोहित शर्माने यावेळी एक मोलाचा सल्ला हार्दिक पंड्याला दिला. रोहितच्या सल्ला हार्दिकने ऐकला त्यामुळेच त्याला विकेट मिळाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.रोहित शर्माने टाइम आऊटमध्ये पहिल्यांदा सूर्यकुमार यादवशी संवाद साधला. यावेली सूर्याला त्याने मैदानात तुम्ही कोणती गोष्टी विसरत आहात, हे सांगितले. त्यानंतर रोहित शर्माने आपला मोर्चा हार्दिक पंड्याकडे वळवला. कारण हार्दिक कर्णधार होता आणि विकेट न मिळाल्यामुले तो हताश झाला होता. यावेळी रोहित शर्मा हार्दिकच्या जवळ आला आणि त्याने हार्दिकला गोलंदाजी कशी करायची, याबाबत एक खूण केली. रोहित शर्मा यावेळी सांगत होता की, तु संथपणे चेंडू टाकला तर तुला विकेट मिळू शकते. हार्दिक त्यावेळी हताश झालाच होता. त्यामुळे त्याने रोहित शर्माचा सल्ला ऐकला. हार्दिक पंड्याने त्यानंतर रोहितने सांगितलेली गोष्ट निकोलस पुरनबरोबर केल्याचे पाहायला मिळाले आणि हार्दिकला यावेळी निकोलस पुरनची विकेट मिळाल्याचे पाहायला मिळाले. पुरन हा चांगल्या फॉर्मात होता. पण रोहितच्या सल्लयामुळे यावेळी हार्दिक पंडयाला विकेट मिळवता आल्याचे सर्वांनी पाहिले. रोहितचा व्हिडिओ यावेळी चांगलाच व्हायरल झाला आहे.रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून किती हुशार आहे, याचा प्रत्यय या सामन्यातही आला. कारण रोहित संघाबाहेर होता. पण तरीही त्याला प्रतिस्पर्धी फलंदाजांची विकेट कशी मिळवायची हे चांगले माहिती असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nwlmePQ

No comments:

Post a Comment