Breaking

Sunday, April 13, 2025

'...तो क्षण मी आजही विसरलो नाही, कुणालाच सोडणार नाही,' नितेश राणेंची ठाकरे गटावर आगपाखड https://ift.tt/zSlaIGd

प्रसाद रानडे, रत्नागिरी : जवळपास चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांनी संमेश्वर येथून तत्कालीन मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे संगमेश्वर येथे नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. 'संगमेश्वर येथे नारायण राणे जेवत असतानाच पोलिसांनी अटक केली होती, तो क्षण मी आजही विसरलेलो नाही. त्याची परतफेड करीन तेव्हाच तो माझ्या मोबाईलमधून तो व्हिडिओ मी डिलिट करेन. ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे,' अशा शब्दांत भाजपचे युवा नेते तथा मंत्री नितेश राणे () यांनी उद्धव ठाकरे () व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांना सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात जिल्हा प्रशासनाने नारायण राणे यांना अटक करण्याची तयारी केली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीच्या मिटिंग मधूनच मोबाईलद्वारे याच विषयासंदर्भात काही सूचना केल्याचा व्हिडिओही त्यावेळी व्हायरल झाला होता. राणे यांना जेवणाच्या ताटावरूनच अटक केल्याचा क्षण आजही आपण आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवला आहे. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली होती. जेवण करत असताना देखील अटक करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब यांनी भाग पाडलं होतं, याची आठवण मंत्री नितेश राणे यांनी करुन दिली आहे. वडील नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.राणे पुढे म्हणाले, ज्यादिवशी या क्षणाची परतफेड करेन, त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट मारणार, कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कुणीही सुटणार नाहीत,' असं नितेश राणेंनी बोलून दाखवलं आहे. दहा वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला, पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिलं आहे. मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली, त्यामुळे ते सगळं जुनं पुसलं गेलं आहे. तिसऱ्या कोणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं, असं देखील नितशे राणेंनी म्हटलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OPHmR71

No comments:

Post a Comment