लखनऊ: वित्त विभागातील आल्याने त्यांचं निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश सचिवालयात ही घटना घडल्याची माहिती आहे. मंगळवारी (27 मे) झालेल्या बैठकीदरम्यान वित्त विभाग- 35 मध्ये तैनात असलेले विभागीय अधिकारी पंकज कुमार यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कृषी उत्पादन आयुक्त (एपीसी) दीपक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपस्थित असताना ही घटना घडली आहे.याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बैठकीदरम्यान पंकज कुमार यांना खोकला आला आणि घाम येऊ लागला. काही क्षणातच ते खुर्चीवर बेशुद्ध पडले. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.पंकज कुमार हे अनुभवी अधिकारी होते. त्यांच्या मृत्यूने सचिवालयात शोककळा पसरली. पंकज कुमार हे शांत, शिस्तप्रिय आणि कष्टाळू अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी सचिवालयाच्या वित्त विभागात बराच काळ योगदान दिले आहे. त्यांच्या अचानक निधनाने सचिवालय परिसरात शोककळा पसरली. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतर सचिवालय कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सुविधा आणि कामाच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की मानसिक दबाव आणि जास्त कामाच्या ताणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कर्मचारी संघटनेने आरोग्य तपासणी शिबिरे आणि नियमित वैद्यकीय सुविधांची मागणी केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, पंकज कुमार यांना सायंकाळी साडे चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात आणण्यात आले होते. त्यांना ताबडतोब कार्डियाक आयसीयूमध्ये नेण्यात आले. सीपीआर आणि चेस्ट मसाज देण्यात आला, परंतु त्यांना वाचवता आले नाही. डॉक्टरांच्या मते, पंकज कुमार यांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांचे शरीर घामाने भिजले होते. ते अस्वस्थ होते, छातीत दुखत होते आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. आयसीयू बेडवर ठेवल्यानंतर त्यांची पल्स मिळाली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मोठा हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XiRwgf6
No comments:
Post a Comment